केंद्रीय मंत्री नारायण राणे झाले ट्रोल : या कारणामुळे नेटकऱ्यांनी धु धु धुतले

हाच का कोकणचा स्वाभिमान ? म्हणत नेटकरी संतापले

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी कोकणच्या दौर्‍यावर जाण्यापूर्वी फेसबुक व ट्विटर एक पोस्ट केली. यात त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर रायगड जिल्ह्यातील तळीये गावाची आणि रत्नागिरी चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत. या पोस्टवर नेटकऱ्यांनी जोरदार आक्षेप घेत नारायण राणे यांना जोरदार ट्रोल केले आहे. हाच का कोकणचा स्वाभिमान ?असे म्हणत नेटकऱ्यांनी नारायण राणेंना चांगलेच फैलावर घेतले आहे.

 

वाचा – नेटकरी नेमके काय म्हणाले ? इथे क्लिक करा  ?

केंद्रीय मंत्री नारायण राणे

राणे, फडणवीस व दरेकरांचा हवाई पाहणी दौरा

राज्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. कोकणात याचा मोठा फटका बसला आहे. महापुर व दरडी कोसळून मोठी जीवित व वित्त हानी झाली आहे. पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी सत्ताधारी व विरोधीपक्ष धावत आहेत. रविवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी कोकण भागाचा हवाई दौरा करत पुरामुळे जनजीवन विस्कळित झालेल्या चिपळूण, महाड, खेड तालुक्याची पाहणी केली.

दरम्यान कोकणच्या दौर्‍यावर असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड मधल्या तळीये गावाला भेट दिली. या ठिकाणी दरड कोसळून अनेकांचा बळी गेला होता. नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत करण्याचे आवाहन राणे यांनी केले. हि घटना अतिशय दुर्दैवी आहे. बचाव कार्याचे काम गतीने सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून उद्ध्वस्त झालेल्या घरांचे पूर्णपणे पुनर्वसन होईल. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पक्क्या घरांचे आयोजन केले जाईल. गावाला जेवढी जमेल तेवढी मदत केंद्र आणि राज्य सरकारकडून केली जाईल, फक्त गेलेले प्राण आम्ही परत करू शकत नाही. पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफ चांगल्या प्रकारे काम करत आहे, त्यांना सहकार्य करावे. गावाला संपूर्ण आधार देण्यात येईल. तात्काळ आणि कायमचं पुनर्वसन गावातच करुन दिले जाईल असे त्यांनी म्हंटले.

राणे पुढे म्हणाले संपूर्ण नुकसानीची पाहणी करून याचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी सादर करणार आहे. पक्की घरे आणि आपत्ती व्यवस्थापन म्हणून एक कायमची एनडीआरएफ ची टीम कोकणात ठेवण्यात यावी अशी मागणी करेल असे राणे शेवटी म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपत्तीग्रस्तांना ज्या प्रकारची मदत अपेक्षित आहे ती मिळेल असे आश्वासन स्थानिकांना दिले.