World cadet wrestling championship | महिला कुस्तीपटू प्रिया मलिकने पटकावले सुवर्णपदक

दिल्ली : एकीकडे टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताचे खेळाडू पदक जिंकण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. तर दुसरीकडे हंगेरी इथे सुरु असलेल्या वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये (World cadet wrestling championship) भारताच्या हाती मोठं यश लागलं आहे. भारताची महिला कुस्तीपटू प्रिया मलिकने (Priya Malik) या स्पर्धेत ७५ किलोग्राम वजन गटात सुवर्णपदक पटकावलं आहे.

 

प्रियाने बेलारूसच्या कुस्तीपटूला ५-०  च्या फरकाने पराभूत करत हे सुवर्ण पदक मिळवलं आहे. प्रियाने२०१९ मध्ये पुण्यात खेलो इंडियामध्येही सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्याचवर्षी २०१९ मध्ये दिल्लीमध्ये १७ व्या स्कूल गेम्समध्येही तिने सुवर्ण जिंकलं असून २०२० मध्ये पटना येथील नॅशनल कॅडेट चॅम्पियनशिपमध्येही तिने सुवर्ण पदक मिळवलं आहे.World cadet wrestling championship