- Advertisement -

Pune Murder News | बापाला अग्नी देत असतानाच लेकीनं केला आईचा भांडाफोड

आईचा बनाव लेकीने केला उघड अन बापाच्या खुनाची बातमी आली समोर

पुणे : तो रोज दारू पिऊन घरी यायचा. बायकोला कामावरून घरी यायला उशिर झाला रे झाला की तो तिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा. दारुड्या नवर्‍याच्या रोजच्या कटकटीला बायको जाम वैतागायची. एका दिवशी दोघांत कडाक्याचे भांडणं झाली. या भांडणात बायकोने दारूड्या नवर्‍याला मारहाण करत त्याचा थेट काटाच काढला.हा खुन पचवण्यासाठी तिने आत्महत्येचा बनाव रचला. त्यात ती यशस्वी ठरणार असे असतानाच तिच्या या कृत्याचा नवर्‍याच्या अंत्यसंस्कारावेळी भांडाफोड झाला.हा भांडाफोड केला तिच्या १३ वर्षीय लेकीनं.तोही स्मशानभूमीत बापाला अग्नी देत असताना. ही धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे.(Pune Murder News)

याबाबत सविस्तर असे की, पुण्यातील गुरूवार पेठेत दिपक बलवीर सोनार ( वय ३६ रा ६०६, गुरूवार पेठ) हा आपल्या पत्नी मुली समवेत राहत होता. दिपक सोनार हा येथील एका जुन्या वाड्यात रखवालदाराचे काम करत होता तर त्याची पत्नी राधिका ही एका कापड दुकानात काम करत असायची.दिपक याला दारूचे व्यसन होते. दिपक व राधिका यांच्यात सतत वाद व्हायचे. राधिका ही कामावरून घरी रात्री उशीरा आल्यास तो तिच्यावर नेहमी संशय घेत असायचा. यामुळेच दोघांचे वाद रोजचेच झाले होते.(Pune Murder News)

Pune Murder News
Pune Murder News

सोमवारी दि १२ रोजी रात्री राधिका ही कामावरून घरी आल्यानंतर दिपक व राधिकात वाद झाले. या वादावादीत राधिकाने दिपक याला लाकडी बॅटने मारहाण केली. त्यानंतर त्याचा जोरात गळा दाबला.या झटापटीत दिपकचा मृत्यू झाला.(Pune Deepak Balveer Sonar Murder News) ही घटना सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली होती. घटनेवेळी राधिका पती दिपकला मारहाण करत असताना मुलगी घरात होती. तिने हा सर्व प्रकार पाहिला होता.(Pune Murder News)

पोलिसांना संशय येऊ नये म्हणून राधिकाने दिपकचा मृतदेह उचलून बाधरूमध्ये दोरीने लटकवला. व कुणाला काही संशय येऊ नये म्हणून ती दोन दिवस बाहेर गेली होती.दोन दिवसानंतर घरी परतल्यानंतर तीने पतीने गळफास घेतल्याचा गाजावाजा केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.(Pune Murder News)

दरम्यान मयत दिपकच्या अंत्यसंस्काराच्या वेळी दिपक याच्या मुलीने आईच्या कृत्याचा भांडाभोड करत वडिलांचा खून आईने केल्याचे इतर नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास करून आरोपी महिलेला ताब्यात घेतले. पुढील तपास खडक पोलिस करत आहेत.(Pune Murder News)

महत्वाचं : तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. आपल्या परिसरातील ब्रेकिंग बातम्यांसाठी Jamkhed Times - जामखेड टाईम्सला YouTube, Facebook, twitter व Dailyhunt वर न विसरता (फॉलो) (Follow) व सबस्क्राईब (subscribe) करा यातुन आमच्या टिमला ऊर्जा मिळते.