karjat Jamkhed Vidhan Sabha Election 2024 Results Live Updates : कर्जत जामखेड विधानसभा निवडणूक 2024 निकाल लाईव्ह अपडेट्स
Karjat Jamkhed Assembly Election 2024 Result Live Updates : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये आज सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली. 27 फेऱ्यांमध्ये होणाऱ्या मतमोजणीची पहिली फेरी संपन्न झाली आहे.
आमदार राम शिंदे विरुद्ध रोहित पवार यांच्यात होत असलेल्या लढतीचा निकाल काय लागणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पहिल्या फेरीचा निकाल समोर आला असून यामध्ये रोहित पवार यांनी 288 मतांची आघाडी घेतली आहे. अतिशय घासून निकाल लागणार असल्याचे पहिल्या फेरीतूनच स्पष्ट झाले आहे.
पहिल्या फेरीत भाजपा उमेदवार आमदार प्रा.राम शिंदे यांना 5289 तर राष्ट्रवादीचे उमेदवार 5577 मते मिळाली. यामध्ये अपक्ष उमेदवार रोहित चंद्रकांत पवार यांना 223 मते मिळाली. पहिल्या फेरीत रोहित पवार 288 मतांनी आघाडीवर आहेत.
पहिल्या फेरीत सर्व उमेदवारांना मिळालेली मते खालील प्रमाणे
दुसऱ्या फेरीत राम शिंदेंची आघाडी
आमदार राम शिंदे यांनी दुसऱ्या फेरीत आघाडी घेतली आहे. आमदार राम शिंदे यांना 10239 तर रोहित पवारांना 9609 मते मिळाली आहे. यामध्ये प्रा राम शिंदे यांनी 630 मतांची आघाडी घेतली आहे.
दुसर्या फेरीत उमेदवारांना मिळालेली मते
तिसर्या फेरीत आमदार राम शिंदे यांची आघाडी कायम
पहिल्या फेरीमध्ये पिछडीवर पडलेले आमदार राम शिंदे यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या फेरी अखेर आमदार राम शिंदे हे 1549 मतांनी आघाडीवर आहे. तिसऱ्या फेरी अखेर आमदार राम शिंदे यांना 15798 तर रोहित पवार यांना 14249 मते मिळा आहेत.
तिसऱ्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली मते खालील प्रमाणे
आमदार राम शिंदे यांनी चौथ्या फेरीतही आघाडी कायम ठेवली आहे. चौथ्या फेरीत त्यांनी 2143 मतांचा आघाडी घेतली आहे. राम शिंदे यांना 20422 तर रोहित पवार यांना 18279 मते मिळाले आहेत.
आमदार प्रा राम शिंदे यांनी पाचव्या फेरीतही आघाडी कायम ठेवली आहे. पाचव्या फेरी अखेर शिंदे हे 1042 मतांनी आघाडीवर आहेत. शिंदे यांना 24984 तर पवार यांना 23942 मते मिळाली आहेत.
सहाव्या फेरीत अखेर आमदार राम शिंदे यांची आघाडी कायम आहे. शिंदे यांनी 1327 मतांची आघाडी घेतली आहे. सहाव्या फेरीत अखेर शिंदे यांना 29525 तर पवार यांना 28198 मते मिळाली आहेत.
सातव्या फेरीत रोहित पवार यांनी आघाडी घेतली आहे. सलग पाच फेऱ्यांमध्ये आघाडीवर असलेले राम शिंदे पिछाडीवर पडले आहेत. रोहित पवारांनी 566 मतांनी आघाडी घेतली आहे. रोहित पवार यांना 34402 तर राम शिंदे यांना 33836 मते मिळाली आहेत.
आठव्या फेरीत रोहित पवारांनी 1849 मतांची आघाडी घेतली आहे. रोहित पवार यांना 39940 तर राम शिंदेंना 38091 मते मिळाली आहेत. रोहित पवार यांनी सातव्या व आठव्या फेरीत लीड घेतले आहे.