MPSC | अजित पवारांची मोठी घोषणा… 31 जुलै पर्यंत होणार … (Deputy Chief Minister Ajit Pawar announced in the convention that all the vacancies of MPSC will be filled by 31st July 2021.)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा / मुंबई : एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या स्वप्नील लोणकर या तरूणाच्या आत्महत्येनंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापल्याचं दिसून येत आहे. (MPSC)एमपीएससीचे प्रश्न तातडीने सोडवावेत यासाठी अधिवेशनात देखील याचे आज पडसाद उमटले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एमपीएससी (MPSC) संदर्भात आज एक मोठी घोषणा केली आहे. ( Deputy Chief Minister Ajit Pawar announced in the convention that all the vacancies of MPSC will be filled by 31st July 2021)

राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी एमपीएससीवरुन सरकारला कोडींत पकडण्याचा प्रयत्न केला.देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात एमपीएससी परीक्षेचा (MPSC Exam) मुद्दा उपस्थित करत अधिवेशनाच्या कामकाजात इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवून आधी एमपीएससीवर चर्चा व्हावी,अशी मागणी केली. (Deputy Chief Minister Ajit Pawar announced in the convention that all the vacancies of MPSC will be filled by 31st July 2021.)

 Deputy Chief Minister Ajit Pawar announced in the convention that all the vacancies of MPSC will be filled by 31st July 2021

एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर याची सुसाईड नोट फडणवीस यांनी सभागृहात वाचून दाखवली. राज्य सरकार (MPSC) एमपीएससीबाबत गंभीर नाही. राज्यातील लाखो मुलं परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. अशावेळी सरकार आणि आयोग नेमकं करतंय काय ? असा थेट सवाल फडणवीसांनी यावेळी केला. देवेंद्र फडणवीसांच्या या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा अधिवेशनात केली. याची तातडीने अंमलबजावणी झाल्यास अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. (Deputy Chief Minister Ajit Pawar announced in the convention that all the vacancies of MPSC will be filled by 31st July 2021.)