जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कर्जत-जामखेडची आरोग्य व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पाच रुग्णवाहिका मिळाल्या असून आज (सोमवार) आमदार रोहित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. (With a view to strengthen the health system of Karjat-Jamkhed, five ambulances have been received for the primary health centers in MLA Rohit Pawar’s constituency and they were inaugurated today (Monday) by MLA Rohit Pawar.)
आमदार झाल्यापासून रोहित पवार यांनी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी अनेक वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. त्याचाच भाग म्हणून आता मतदारसंघासाठी आणखीन पाच नव्या रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत तीन तर राज्य शासनामार्फत मिळालेल्या दोन रुग्णवाहिकांचा समावेश आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातूनही आणखी एक रुग्णवाहिका मिळाली आहे. (Five more new ambulances arrived for Karjat-Jamkhed constituency )