जामखेड टाईम्स वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी जामखेड टाईम्सचे मुख्यसंपादक सत्तार शेख यांची तर उपाध्यक्षपदी जामखेड न्यूजचे संपादक सुदाम वराट तसेच सचिवपदी रोखठोक न्यूजचे संपादक अविनाश बोधले यांची आज निवड करण्यात आली आहे.

डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणीची घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ पत्रकार राजा माने यांनी आज केली आहे. त्यामध्ये जामखेड तालुकाध्यक्षपदी जामखेड टाईम्सचे संपादक सत्तार शेख यांची निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
राज्य कार्यकारिणीकडून तालुकाध्यक्षपदी निवड होताच नवनिर्वाचित अध्यक्ष सत्तार शेख यांनी जामखेड तालुक्यामध्ये डिजीटल मिडीयात स्वतंत्र पत्रकारिता करत असलेल्या संपादकांची आज जामखेडमध्ये बैठक घेतली. या बैठकीत जामखेड तालुक्यात डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटना स्थापन्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत संघटनेच्या तालुका उपाध्यक्षपदी जामखेड न्यूज पोर्टलचे संपादक सुदाम वराट यांची निवड करण्यात आली. तर सचिवपदी रोखठोक न्यूज पोर्टलचे संपादक अविनाश बोधले यांची निवड करण्यात आली. संघटनेचे जामखेड तालुक्यातील नवे पदाधिकारी पुढील प्रमाणे : तालुकाध्यक्ष- सत्तार शेख ( जामखेड टाईम्स) , उपाध्यक्ष सुदाम वराट (जामखेड न्यूज ), सचिव – अविनाश बोधले (रोखठोक न्यूज), सदस्य – फारूक शेख (एफ एम स्टार न्यूज ) सदस्य – संदेश हजारे ( द संदेश) यांचा समावेश आहे.
राज्य उपाध्यक्षपदी तुळशीदास भोईटे तर सचिवपदी नंदकुमार सुतार

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्याच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी आज केली. संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी तुळशीदास भोईटे (मुंबई) तर सचिवपदी नंदकुमार सुतार(पुणे), राष्ट्रीय समन्वयकपदी राजू वाघमारे (पुणे), सहसचिवपदी केतन महामुनी (पुणे) यांची निवड करण्यात आली आहे. विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख (नागपूर), उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी शिवाजी शिर्के (अहमदनगर), मराठवाडा अध्यक्षपदी डॉ.रेखा शेळके (औरंगाबाद), कोकण अध्यक्षपदी सागर चव्हाण (सावंतवाडी) तर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी शिवाजी सुरवसे (सोलापूर) त्याचबरोबर जामखेड तालुकाध्यक्षपदी जामखेड टाईम्सचे मुख्यसंपादक सत्तार शेख यांची निवड करण्यात आली.
डिजिटल मिडिया क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच घटकांचे हित जोपासणे आणि पत्रकारिता व सामाजिक मूल्यांचे जतन करत या क्षेत्राच्या गुणात्मक विकासासाठी स्थापन झालेल्या डिजीटल मिडीया संपादक पत्रकार या संघटनेचे मार्गदर्शक सल्लागार म्हणून ज्येष्ठ संपादक व विचारवंत अरुण खोरे हे कार्यरत आहेत. संघटनेच्या राज्यातील काही पदाधिकाऱ्यांची घोषणा संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी आज केली.
राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांची नावे अशी
