जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Fertilizer rates in Maharashtra | लहरी हवामानाचा मोठा फटका शेती व्यवसायाला बसल्याने यंदा शेती संकटात आहे. अश्यातच आता खतांचे दर गगनाला भिडल्याने बळीराजा पुरता संकटात सापडला आहे.
सध्या रब्बी हंगामात बळीराजाकडून पिकांच्या वाढीव व पोषणासाठी विविध खते घेण्याकडे कल वाढला आहे. मात्र खतांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने गोरगरीब शेतकऱ्यांना खते घेणे मुश्किल होऊन बसले आहे.अवकाळी पावसाच्या धुमशानामुळे बळीराजा आधीच हैराण आहे. त्यात आता आणखी एक संकट समोर ठाकलं आहे.
रब्बी हंगाम जोमात असताना खतांची मागणी वाढली आहे. खतांच्या किमतीत पिशवीमागे 50 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे.आधीच अवकाळीमुळे बेजार झालेल्या शेतक-याचं पार गणितच बिघडलं आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात खत उत्पादकांनी खतांच्या किमती जाहीर केल्या. मात्र, काही दिवसांपूर्वी अचानक खतांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.
- जामखेड : चोंडी येथील अंजली संतोष कुरडुले हिने पटकावला तालुकास्तरीय स्पर्धेत पहिला क्रमांक !
- frist time mla in maharashtra 2024 list : महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४मध्ये पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची यादी
- Devendra fadnavis cm : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कोण घेणार शपथ, महत्वाची अपडेट आली समोर
- Ram Shinde News : आमदार राम शिंदे ठरले सर्वाधिक मते घेऊन सर्वात कमी फरकाने पराभूत झालेले राज्यातील क्रमांक एकचे उमेदवार
- karjat Jamkhed Vidhan Sabha Election 2024 Results Live Updates : कर्जत जामखेड विधानसभा निवडणूक 2024 निकाल लाईव्ह अपडेट्स
रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रात लागवड योग्य क्षेत्र वाढलंय. गहू, हरभरा, ज्वारी आणि कांद्यासाठी खतांची मागणी वाढलीय. मात्र अचानक दरवाढीमुळे शेतक-याला मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
किती रुपयांनी वाढले दर ? (Fertilizer rates in Maharashtra)
10:26:26 या खताची 1470 रुपयांना मिळणारी पिशवी आता 1640 रुपयांना मिळत आहे.
12:32:16 या खताची 1470 रुपयांची पिशवी 1640 रु रुपयांवर गेली आहे.
16:20:0:13 या खताचे दर 1050 वरून थेट 1350 रूपयांवर गेले आहेत.
15:15:15:09 या खताचे दर 1080 वरून 1350 रूपयांवर गेले आहेत.
अमोनियम सल्फेटची 875 रुपयांची पिशवी 1000 रुपयांना मिळू लागली आहे
16:20:0:13 या खताचे जुने दर 1050 होते ते तब्बल 1350 तर 15:15:0:9 खताचे जुने दर 1080 रुपये एवढे होते. नवे दर 1350 रुपयांवर गेलेत खतांच्या वाढलेल्या किमतीबद्दल कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय खते आणि रसायनमंत्री मनसुख मंडाविया यांना पत्र लिहिलं आणि खतांचे दर कमी करून पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.
राज्यातला शेतकरी आधीच कोरोना, गारपीट आणि अवकाळीचा तडाखा सहन करत आहे. त्यात खतांच्या किमती वाढल्यानं त्याचं जगणंच अवघड झालं आहे. अस्मानी संकटांना पर्याय नाही पण आधीच पिचलेल्या बळीराजाला खतांच्या किमती कमी करून थोडा का होईना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारनं करायला हवा.