Omicron 20 symptoms | अभ्यासातून समोर आले ओमिक्रॉन व्हेरिएंटची 20 लक्षणं, जाणून घ्या सविस्तर

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Omicron 20 Symptoms | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. तसेच ओमिक्रॉन रूग्णांच्याही संख्येत वाढ होऊ लागली आहे. जगभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत अनेक भीतीदायक दावे केले जात आहेत. परंतू महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा शिरकाव होऊनही तो जास्त सक्रीय झालेला नसल्याने भीतीदायक दाव्यांची हवा निघून गेली आहे.

मात्र, कोरोनाच्या नियमित रूग्णांमध्ये होत असलेली वाढ चिंताजनक आहे. महाराष्ट्रात 40 हजार रूग्ण दैनंदिन आढळून येत आहेत. दरम्यान जगभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत झालेल्या संशोधनातून या विषाणूचे 20 लक्षणे आता जगासमोर आले आहेत. (Omicron 20 Symptoms)

ओमिक्रॉन व्हेरिएंट बाबत इंग्लंडमध्ये झालेल्या संशोधनातून 20 लक्षणं समोर आली आहेत. ही लक्षणं किती काळ दिसून येतात, त्याची माहितीदेखील पुढे आली आहे. (Omicron 20 Symptoms)

ओमायक्रॉनची लक्षणं खालीलप्रमाणे (Omicron 20 Symptoms)
१. डोकेदुखी
२. नाक गळणं
३. थकवा
४. शिंका येणं
५. घशात खवखव
६. सततचा खोकला
७. कर्कश आवाज
८. थंडी वाजणं/हुडहुडी भरणं
९. ताप
१०. भोवळ येणं
११. ब्रेन फॉग
१२. वास न येणं
१३. डोळे दुखणं
१४. मांसपेशींमध्ये वेदना
१५. भूक न लागणं
१६. सुगंध न येणं
१७. छातीत वेदना
१८. ग्रंथींमध्ये सूज
१९. कमजोरपणा
२०. त्वचेवर रॅश येणं

ही लक्षणे किती काळ टिकतात? (How long do these symptoms last?)

डेल्टाच्या तुलनेत ही लक्षणं वेगानं दिसून येतात. ओमायक्रॉनची लागण झाल्यानंतर २ ते ५ दिवसांमध्ये लक्षणं दिसू लागतात, असं आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं. ताप येणं ही ओमायक्रॉनचं लक्षण आहे. ५ दिवसांपर्यंत ही लक्षणं दिसून येतात, अशी माहिती ब्रिटिश महामारीतज्ज्ञ टिम स्पेक्टर यांनी दिली.

डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनची लक्षणं कमी दिवस राहतात. ५ दिवसांनंतर चाचणी निगेटिव्ह आली असल्यास ५ दिवसांत लक्षणं येऊन गेली, असा होतो. ओमायक्रॉनची लक्षणं जितक्या वेगानं दिसून येतात, तितक्याच वेगानं ती निघूनही जातात. बहुतांश लोकांमध्ये ही लक्षणं ३ ते ५ दिवस दिसतात, असं स्पेक्टर यांनी सांगितलं. लस घेतलेल्या लोकांमध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणं दिसून येतात. कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेल्या लोकांमध्ये गंभीर स्वरुपाची लक्षणं दिसतात, असं ते म्हणाले. (Omicron 20 Symptoms)