Ketan Agrawal: काळाचा क्रूर डाव! भावी पत्नीचा वाढदिवस.. ट्रेकिंग.. अन् मृत्यूचा थरार.. लोहगडच्या दरीत कोसळून तरूणाचा करुण अंत !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Ketan Vishal Agrawal Pune : भावी पत्नीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणाचा चारशे फूट खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना मावळातील लोहगड किल्ल्यावर घडल्याने वाढदिवसाचा आनंद क्षणात दु:खात बुडाला. ही घटना गुरुवारी (१८ जून) घडली. (Ketan Agrawal)

केतन विशाल अग्रवाल (Ketan vishal Agrawal) असे लोहगडाच्या कड्यावरून दरीत पडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. केतन हा अवघ्या २६ वर्षांचा होता. तो पुण्याच्या मावळ येथील गहुंजे परिसरातील लोढा बेलमोंडो सोसायटीत वास्तव्यास होता. केतनचं लग्न ठरलं होतं. पावसाळ्यानंतर त्याचं नोव्हेंबर महिन्यात लग्न आयोजित करण्यात आलं होतं. पण अचानक अशी दु्र्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. (Ketan vishal Agrawal news)

लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल हा तरुण त्याच्या होणाऱ्या बायकोच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ट्रेकिंगला गेला होता. तो होणाऱ्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गुरुवारी सकाळी त्याच्या कारने लोहगड येथे आला होता. केतन होणाऱ्या बायकोसोबत ट्रेकिंगला आला होता. त्यामुळे तो प्रचंड आनंदात होता. पण गडावरील कड्यावरुन अचानक तोल गेल्याने त्याचा दरीत पडून मृत्यू झाला.

केतन लोहगडावर ट्रेकिंगचा आनंद घेत होता. यावेळी गडावरील एका कड्यावरुन त्याचा तोल गेला. यामुळे सुमारे साडेचारशे फूट खोल दरीत तो पडला. या घटनेत केतन गंभीर जखमी झाला. इतक्या उंचावरुन पडल्याने तो गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, पोलिस कर्मचारी पवन कराड, जय पवार, प्रशांत तुरे, प्रणय उकिरडे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पहाणी केली. पोलिसांनी या घटनेची माहिती लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र आपत्कालीन पथकाला कळविली. घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्र आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले.

या पथकातील आदिती गायकवाड, वैष्णवी भांगरे, सचिन गायकवाड, विशालभाऊ पिसे, सागर दळवी, कुणाल कडू, सागर कुंभार, योगेश साखरे, सपना साखरे, समीक्षा साखरे, आर्यन साखरे, स्वप्निल मोकाशी, कैसर शेख, राजेंद्र कडू, योगेश दळवी, महेश मसणे, सुनील गायकवाड यांनी लोहगड परिसरातील घनदाट झाडीत तब्बल तीन तास शोध मोहिम राबवली.

त्यानंतर खोल दरीतून केतनचा मृतदेह बाहेर काढला. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तळेगाव दाभाडे येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा केतन हा मुलगा आहे. त्याचा विवाह पावसाळ्यानंतर होणार होता. लग्नाची जय्यत तयारी सुरु होती. त्याच्या कुटुंबीयांनी या लग्नसोहळ्यासाठी जयपूर येथे 17 कोटी रुपये खर्च करून पॅलेस बुक केले होते. तर पाहुण्यांना जयपूर येथे घेऊन जाण्यासाठी दोन विशेष विमानांची सोय देखील केली होती अशी माहिती मिळाली आहे.