Radhamohan Mishra Case: खरात फाईलनंतर आता ‘मिश्रा फाईल’ने पुणे हादरले; भोंदू बाबाच्या आश्रमात सापडले ३५ जोडप्यांचे प्रायव्हेट व्हिडिओ!

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात भोंदू बाबांचा उच्छाद वाढला आहे. नाशिकच्या अशोक खरात या बाबाच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण ताजे असतानाच, आता पुण्यातून उत्तर भारतातील एका हायप्रोफाईल भोंदू बाबाचे घृणास्पद कृत्य समोर आले आहे. स्वतःला ईश्वराचा अवतार सांगून महिला भक्तांचे मानसिक, आर्थिक आणि लैंगिक शोषण करणाऱ्या कथित भोंदूबाबा राधामोहन मिश्रा (५९) (Radhamohan Mishra Case) याला खराडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या आश्रमातून जप्त केलेल्या डिजिटल साहित्यातून अत्यंत धक्कादायक खुलासे झाले आहेत.

Radhamohan Mishra Case, After Kharat file, Pune is now rocked by Mishra file, private videos of 35 couples found at fraudulent godman's ashram,

हायलाईट्स

  1. ३५ जोडप्यांचे प्रायव्हेट व्हिडिओ जप्त: आरोपी बाबाने भक्तांना त्यांच्या पतीसोबतचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून पेनड्राइव्हद्वारे स्वतःकडे पाठवण्यास भाग पाडले होते.
  2. १७ वर्षे अमानुष छळ: उच्चशिक्षित संगणक अभियंता तरुणीवर २००९ ते २०२६ दरम्यान वारंवार बलात्कार आणि क्रूर अत्याचार.
  3. विजेचे शॉक आणि अघोरी प्रथा: पीडितेला स्वतःचे मूत्र पाजणे, अमानुष मारहाण करणे आणि विजेचे शॉक दिल्याचा फिर्यादीत उल्लेख.
  4. पळून जाण्यासाठी भुयार: नाशिकच्या खरात बाबावर कारवाई झाल्यानंतर मिश्रा सावध झाला होता आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी आश्रमात भुयार खोदत होता.

​मिश्राच्या आश्रमात सापडला डिजिटल पुराव्यांचा खजिना

​खराडी पोलिसांनी राधामोहन मिश्राच्या आश्रमावर टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणावर डिजिटल साहित्य जप्त केले आहे. जप्त केलेल्या २३ पेनड्राइव्हच्या प्राथमिक तपासात तब्बल ३५ जोडप्यांच्या खाजगी क्षणांचे चित्रीकरण आढळल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. पोलिसांनी खालील साहित्य जप्त केले आहे.

  • लॅपटॉप व टॅब: १२ लॅपटॉप, १ टॅब
  • ​मोबाईल: ११ स्मार्टफोन
  • हार्डडिस्क व पेनड्राइव्ह: १९ हार्डडिस्क, २३ पेनड्राइव्ह
  • इतर: डीव्हीडी, सीडी, ६.५ लाखांची रोकड, १५ लाखांचे दागिने आणि १० जिवंत काडतुसे.

पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आता या व्हिडिओमधील व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

​अंधश्रद्धेचा फायदा घेऊन क्रूरतेची पराकाष्ठा

​पीडित तरुणी पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करते आणि तिचे आई-वडील डॉक्टर आहेत (मूळचे हरियाणा). २००१ मध्ये या कुटुंबाचा संपर्क मिश्राशी आला होता. बाबाने तरुणीच्या पालकांचा अंधविश्वास असा फायदा घेतला की, पीडितेने अनेकदा तक्रार करण्याचा प्रयत्न केला तरी बाबा आधीच तिला घरच्यांच्या नजरेत खोटे ठरवायचा.

​२०१३ ते २०१६ दरम्यान मिश्राने तरुणीला तिच्या पतीपासून विभक्त होण्यास भाग पाडले, तिचे अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केले आणि तिची कोट्यवधींची मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली. अखेर नराधमाच्या तावडीतून सुटून पीडितेने पालकांसमोर या भोंदूचा बुरखा फाडला आणि पोलिसात धाव घेतली.

​मुख्य आरोपींसह साथीदारांवर गुन्हे दाखल

​खराडी पोलिसांनी या प्रकरणी राधामोहन मिश्रा (रा. उबाळेनगर, पुणे) आणि त्याचा साथीदार स्वामी कंवल नयन (५८) यांच्यासह अन्य ६ महिलांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आरोपींवर लैंगिक अत्याचार, गुन्हेगारी कट आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जातुटोणा विरोधी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.