Ketan Agrawal pune news : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड, लोहगडावरील प्लॅन फसल्यास महाबळेश्वरमध्ये करायचा होता गेम ओव्हर|Siya Goyal, Chetan Chaudhari

Ketan Agrawal Pune News  :  पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. केतनचा मृत्यू हा अपघात नसून घातपात (Ketan Agrawal Murder Case) असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनीही अनेक धक्कादायक खुलासे केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Ketan Agrawal Siya Goyal)

Ketan Agrawal Pune News, Major development in Ketan Agrawal death case, plan was to finish him off in Mahabaleshwar if  plot at Lohagad failed, Siya Goyal, Chetan Chaudhari, latest news,

होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतन अग्रवाल हा तरूण पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात १८ जून रोजी
लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता. त्यावेळी तोल जाऊन तो दरीत कोसळला होता. या अपघातात त्याचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचं समोर आलं होतं.मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून घातपात असल्याचं निष्पन्न झाले आहे. (Ketan Agrawal pune)

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, केतनची होणारी पत्नी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा कथित प्रियकर चेतन (Chetan Chaudhari) यांनी मिळून केतनचा (Ketan Agrawal) खून केल्याचा संशय आहे. त्याचे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. अशातच आता केतनच्या वडिलांनी म्हणजेच विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांनी पोस्ट करत धक्कादायक आरोप केले आहेत.

सियाचे अनैतिक संबंध

पुण्यातील सिया प्रवीण बसेसर गोयल या धूर्त मुलीने, जिचे आधीपासूनच अनैतिक संबंध होते, तिने आमचा साधा-भोळा मुलगा केतन याच्याशी एक बनावट विवाह रचला. तिच्या चारित्र्याबद्दल आणि भूतकाळातील वागणुकीबद्दल तिच्या संपूर्ण कुटुंबाला व नातेवाईकांना पूर्ण कल्पना होती; तरीही त्यांनी जाणीवपूर्वक सत्य लपवून ठेवले आणि आमची मोठी फसवणूक केली, असा आरोप विशाल अग्रवाल यांनी पोस्टमध्ये केला आहे. आम्हा पीडित पालकांच्या अंतःकरणातून शाप आणि न्यायासाठीचा आक्रोश होत आहे, असंही म्हणत त्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं. (Ketan Agrawal Case)

जीव घेण्याची काय गरज होती?

एवढंच नाही तर केतनच्या वडिलांनी धक्कादायक आरोप केले आहेत. ‘त्या मुलीने यापूर्वीही केतनचा जीव घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. अखेरीस, 18 तारखेला तिने त्याच मित्राच्या मदतीने आमच्या मुलाचा निर्घृणपणे जीव घेतला. समाजाला आमचा एकच प्रश्न आहे. जर त्या मुलीचे वागणे असे होते, तर संबंध सहजपणे तोडता आले असते. मग आमच्या निष्पाप मुलाचा जीव घेण्याची काय गरज होती? या कधीही भरून न येणाऱ्या हानीची भरपाई कोण करणार? असं म्हणत वडिलांनी संताप व्यक्त केला आहे. (Ketan Agrawal Pune Case)

महाबळेश्वरला मारण्याचा प्लॅन होता

दरम्यान, आरोपींनी याआधी देखील त्याच्यावर जीवघेणा प्रयत्न केला होता. पण तेव्हा त्यांना यश आलं नाही. तसेच लोहगडावर केतनला मारता आलं नाही तर महाबळेश्वरला त्याला घेऊन जायचा त्यांचा प्लॅन होता, असंही केतनच्या वडिलांनी आरोप केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखीच चिघळणार असं चित्र दिसतंय. (Ketan Agrawal lohgad)

पोलीस अधिकारी संदीप सिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषद घेत लोहगड हत्या प्रकरणाचा खुलासा केला आहे. केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयलने आपला प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने ही हत्या घडवून आणल्याची माहिती दिली आहे. एका बड्या बिझनेसमनच्या मुलाची अशाप्रकारे हत्या केल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Siya Goyal Ketan Agrawal pune)

गिल्ल यांनी नक्की काय सांगितलं?

१८ जूनला केतन अग्रवाल नावाचा तरुण लोहगड किल्यावरून पडल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. या घटनेनंतर मयत केतन आणि सियाचे कुटुंब घटनास्थळी गेले. त्याच दिवशी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा जेव्हा पोलिसांनी तपास केला, तेव्हा काही बाबी संशयास्पद आढळल्या. जेव्हा यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला, तेव्हा ही घटना अचानक होणं, शक्य नाही, असं आम्हाला समजलं. कारण केतन हा चांगला ट्रेकर होता, त्याने विविध गडकिल्ल्यावर ट्रेकींग केलं होतं. (Ketan Agrawal Case latest news)

यानंतर मयताच्या कुटुंबाने देखील यावर संशय व्यक्त केला. यानंतर तांत्रिक पुरावे आणि काही साक्षीदारांच्या मदतीने पोलिसांनी तपास केला. तेव्हा केतनची होणारी पत्नी सिया गोयलचा मित्र चेतन चौधरी याचं नाव समोर आलं. सिया गोयलच्या वडिलांचा जिथे व्यवसाय आहे, तिथेच या चेतन चौधरीच्या कुटुंबाचा देखील व्यवसाय आहे. दोघंही मागील एक वर्षापासून एकमेकांना ओळखत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. यातूनच या दोघांनी प्लॅन केला. (Ketan Agrawal Siya Goyal latest news today)

घटनेच्या दिवशी केतन आणि सिया लोहगडावर फिरायला गेले होते. याच वेळी प्रियकर चेतन त्यांचा पाठलाग करत होता. दरम्यान, लोहगडावर फिरत असताना चेतन आणि सियाने केतनला धक्का दिला. यात केतनचा ४०० फूट दरीत कोसळून मृत्यू झाला.

गुन्हे शाखेच्या पथकाने केतन आणि सियाच्या पार्श्वभूमीचा तपास सुरू केला असता, सिया गोयल हिचे दुसऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले. याच दरम्यान केतनचे वडील विशाल देवीचंद अगरवाल यांनी थेट फिर्याद दिली की, सिया गोयल (Siya Goyal) हिचे चेतन चौधरीसोबत प्रेमसंबंध असल्याने त्यांनी संगनमत करून माझ्या मुलाला किल्ल्यावरून ढकलून मारले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. (Ketan Agrawal Siya Goyal news)