Cough syrup News In Marathi : औषध विक्रेत्यांनो सावधान : डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप दिल्यास होणार कठोर कारवाई, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Cough syrup News In Marathi : मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विषारी कफ सिरप च्या सेवनामुळे १५ ते २० लहान बालकांचा मृत्यु झाला आहे. या घटनेने देशभर खळबळ उडवून दिलीय. या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधात्मक उपाय योजना हाती घेतल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने राज्यातील किरकोळ औषध विक्रेत्यांसाठी एक नवा आदेश जारी केला आहे. या आदेशाचे सक्तीने पालन न केल्यास औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये कफ सिरप घेतल्यानंतर लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील एका १८ महिन्याच्या बालिकेच्या मृत्यूची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेनंतर राज्याचा अन्न व औषध प्रशासन विभाग खडबडून जागा झाला आहे. कफ सिरपचा अतिरेकी किंवा चुकीचा वापर लहान मुलांच्या आरोग्यास घातक ठरू शकतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन प्रशासन विभागाने राज्यभरातील सर्व औषध विक्रेत्यांना सावधगिरीचे निर्देश दिले आहेत. (Cough syrup News In Marathi)

विषारी कफ सिरपच्या सेवनामुळे लहान बालकांच्या मृत्यूच्या केसेस वाढल्याने देशात चिंतेचे वातावरण आहे. या धक्कादायक घटनांनंतर महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील औषध विक्रेत्यांना आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ७ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी करण्यात आला असून, राज्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी त्याचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास शासनाकडून औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
Cough syrup News In Marathi : राज्यातील सर्व औषध विक्रेत्यांना सक्त सूचना
“अन्न व औषध प्रशासनविभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, राज्यातील सर्व किरकोळ औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या लिखित प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणतेही कफ सिरप विकू नये. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल.” या निर्णयामुळे औषध विक्रेत्यांनी आता ग्राहकांना कफ सिरप विकताना डॉक्टरांनी दिलेल्या औषध चिठ्ठीची मागणी करणे आवश्यक आहे. औषध व सौंदर्य प्रसाधन नियम १९४५ अंतर्गत अनुसूची एच, अनुसूची एच-१ आणि अनुसूची एक्स मधील औषधांची विक्री ही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच केली जाईल ह्याची खात्री करावी, असे या आदेशात म्हटले आहे.
डॉक्टर आणि पालकांना आवाहन
औषध प्रशासन विभागाने डॉक्टरांनाही सूचित केले आहे की, लहान मुलांसाठी कफ सिरप prescribe करताना ते अत्यंत विचारपूर्वक वापरावे. पालकांनीसुद्धा आपल्या मुलांना स्वतःहून बाजारातील कोणतेही कफ सिरप देऊ नये, तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Cough syrup News In Marathi)
राज्य औषध प्रशासनाने जिल्हा औषध निरीक्षकांना स्थानिक औषध विक्रेत्यांवर नियमित तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. जर कोणत्याही दुकानात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप विकले जात असल्याचे आढळल्यास, त्या दुकानाविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. (Cough syrup News In Marathi)
मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील बाल मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, भारत सरकार यांनी ०३/१०/२०२५ रोजी कफ सिरपच्या तर्कशुद्ध वापराबद्दल सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने सर्व किरकोळ औषध विक्रेते यांना सूचित केले आहे की,बाल रुग्णांसाठी असलेल्या सर्व सिरप प्रवर्गातील औषधांची विक्री ही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय करू नये. ज्या औषध विक्रेत्यांद्वारा या सूचनांचे अनुपालन केले जाणार नाही त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे परिपत्रक राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने जारी केले आहे. (Cough syrup News In Marathi)