ब्रेकिंग न्यूज : जामखेड नगरपरिषदेच्या नगरसेवक पदाची आरक्षण सोडत जाहीर, कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण वाचा सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या जामखेड नगर परिषदेच्या निवडणूकीचा बिगुल अखेर वाजला आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता नगरसेवकपदाच्या २४ जागांसाठीच्या आरक्षणाची सोडत आज ८ रोजी जाहीर करण्यात आली. कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडले जाणून घ्या

जामखेड नगर परिषद प्रभागनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे
| प्रभाग क्रमांक | आरक्षण |
|---|---|
| 1 अ | ना. मा. प्र. (महिला) |
| 1 ब | सर्वसाधारण |
| 2 अ | ना. मा. प्र. |
| 2 ब | सर्वसाधारण (महिला) |
| 3 अ | ना. मा. प्र. |
| 3 ब | सर्वसाधारण (महिला) |
| 4 अ | अनुसूचित जाती |
| 4 ब | सर्वसाधारण (महिला) |
| 5 अ | अनुसुचित जमाती |
| 5 ब | सर्वसाधारण (महिला) |
| 6 अ | अनुसुचित जाती (महिला) |
| 6 ब | सर्वसाधारण |
| 7 अ | सर्वसाधारण (महिला) |
| 7 ब | सर्वसाधारण |
| 8 अ | ना. मा. प्र. (महिला) |
| 8 ब | सर्वसाधारण |
| 9 अ | सर्वसाधारण (महिला) |
| 9 ब | सर्वसाधारण |
| 10 अ | ना. मा. प्र. (महिला) |
| 10 ब | सर्वसाधारण |
| 11 अ | ना. मा. प्र. |
| 11 ब | सर्वसाधारण (महिला) |
| 12 अ | अनुसू. जाती (महिला) |
| 12 ब | सर्वसाधारण |
गेल्या पाच वर्षांपासुन रखडलेल्या स्थानिका स्वराज्य संस्थांच्या निवडणुक प्रक्रियेला वेग आला आहे. जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अंतीम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर बुधवारी प्रभागनिहाय अरक्षण सोडत काढण्यात आली. पिठासन अधिकारी तथा कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी अजय साळवे हे देखील उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून जामखेड नगरपरिषदेच्या निवडणूका रखडल्या होत्या. अखेर आज बुधवार दि ८ रोजी सकाळी अकरा वाजता जामखेड पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये जामखेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुक २०२५ च्या आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न झाला. प्राथमिक शाळेचे विद्यार्थी श्रेयश सागर व्यवहारे, साई प्रमोद टेकाळे व मोक्षदा मयुर पुजारी या तीन विद्यार्थांच्या हाताने नंबर नुसार प्रभागाची सोडत काढण्यात आली. यावेळी जामखेड शहरातील सर्व पक्षसंघटनांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज जाहीर करण्यात आलेल्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतींवर हरकत नोंदवण्यासाठी दि. ९ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदत आहे. हरकती असल्यास नगरपरिषद कार्यालयात विहीत नमुन्यात हरकती दाखल कराव्यात असे अवाहन प्रशासनाने केले आहे.
