जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विध्वंस सुरूच आहे. आज दिवसभरात तब्बल 232 नव्या कोरोनाबाधितांची जामखेड तालुक्यात भर पडली आहे. तालुक्यातील कोरोनाचा उद्रेक थांबता थांबत नसल्याने जनतेच्या चिंता आता अधिकच वाढल्या आहेत. (Corona outbreak: Corona went two hundred during the day)
जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे किट उपलब्ध होत नसल्याने रॅपिड अँटीजेन चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत. उद्यापासुन या चाचण्या सुरू होतील असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. रॅपिड अँटीजेन चाचण्या थांबवण्यात आल्याने प्रशासनाने RTPCR स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी ताब्यात घेण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून हाती घेतली आहे. आज 07 रोजी प्रशासनाकडे 512 RTPCR कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये एकुण 232 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.
07 रोजी आढळून आलेल्या नव्या कोरोनाबाधितांमध्ये जामखेड 58, आरणगाव 04, कवडगाव 03, पिंपरखेड 05, धानोरा 02, चौंडी 03, हळगाव 05,आघी 01, बावी 03, रत्नापुर 02, खांडवी 01, देवदैठण 04, धामणगाव 02, तेलंगशी 02, जायभायवाडी 01, नायगाव 05, नाहुली 01, सतेवाडी 05, बांधखडक 06, लोणी 01, दरडवाडी 01, पांढरेवाडी 01, वाकी 02, घोडेगाव 07, मोहरी 04, खर्डा 13, नागोबाचीवाडी 04, सोनेगाव 07, दौंडवाडी 06, तरडगाव 02, सातेफळ 02, धनेगाव 04, नान्नज 11, धोतरी 01, हापटेवाडी 01, सावरगाव 03, जमादारवाडी 02, साकत 01, पिंपळवाडी 03, राजुरी 08, बसरवाडी 08, सारोळा 05, पाडळी 03, झिक्री 03, खुरदैठण 04,जवळा 01, चुंभळी 02, शिऊर 03,बऱ्हाणपूर 01, गोयकरवाडी 03,मोहा 02 असे एकुण 232 नव्या कोरोनाबाधितांचा समावेश आहे अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डाॅ संजय वाघ यांनी सायंकाळी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आज दिवसभरात 302 नागरिकांचे स्वॅबनमुने RTPCR कोरोना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.