- Advertisement -

कोरोना सुसाट : कोरोनाने दिवसभरात केले दिडशतक !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात कोरोनाचा धुमाकुळ सुरूच आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तालुक्यात मोठा विध्वंस माजवला आहे. त्यातच आता म्युकर माइकोसिसचाही धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातील पिंपरखेडमधील एका कोरोनाबाधिताला म्युकर माइकोसिसची बाधा झाल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. आज दिवसभरात जामखेड तालुक्यात कोरोनाने दीडशतक पार केले आहे.

जामखेड तालुका आरोग्य विभागाने तालुक्यातील वेगवेगळ्या भागात आज दिवसभरात तब्बल 556 नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या. त्यामध्ये 47 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये जामखेड 02, धोत्री 02, राजुरी 01, मोहा 01,साकत 01, रत्न्पुर 04, हळगाव 02, आघी 01, दौंडाचीवाडी 01, धनेगाव 01, नायगाव 01, जायभायवाडी 17, जवळा 12, सावरगाव 01 या 47 नव्या रूग्णांचा समावेश आहे. रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये जायभायवाडीत सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत.

जामखेड तालुका आरोग्य विभागाला आज सायंकाळी जिल्हा रूग्णालयाकडून 349 RTPCR अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 109 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले त्यामध्ये जामखेड 21, अरणगाव 02, पिंपरखेड 06, हळगाव 03, बावी 01, पाटोदा 03, रत्नापुर 01, डिसलेवाडी 01, जायभायवाडी 03, नायगाव 02, नाहूली 01, सतेवाडी 04, लोणी 01, पांढरेवाडी 01, घोडेगाव 06, पिंपळगाव उंडा 01, पिंपळगाव आवळा 02, वाघा 01, दिघोळ 01, मोहरी 01, खर्डा 09, गितेवाडी 01, सोनेगाव 02, दौंडवाडी 01, आनंदवाडी 01, नान्नज 05, पोतेवाडी 01, हापटेवाडी 01, सावरगाव 02, जमदारवाडी 02, कोल्हेवाडी 04, राजुरी 05, बसरवाडी 04, पाडळी 03, झिक्री 01, खुरदैठण 02, मतेवाडी 01 या 109 रूग्णांचा समावेश आहे. आज दिवसभरात प्रशासनाने 234 नागरिकांचे स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डाॅ संजय वाघ व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ सुनिल बोराडे यांनी सायंकाळी माध्यमांशी बोलताना दिली आहे.