Buldhana Bus Accident : आगीत होरपळणाऱ्या प्रवाशांचा आकांत हृदय पिळवटून टाकणारा, समृध्दी महामार्गावर बस जळून खाक, 26 जीवांचा झाला कोळसा, महाराष्ट्र हादरला

बुलढाणा, 1 जूलै 2023  : Buldhana Bus Accident : बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. समृध्दी महामार्गावर बसचा भीषण अपघात झाला. या घटनेत बस जळून खाक झाल्याने 26 प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू झाला. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.सिंदखेड राजा तालुक्यातील पिपळखूटा शिवारात आज पहाटे ही घटना घडली. (Buldhana Bus Fir)

Buldhana Bus Accident, Akant of passengers is heart-wrenching, bus burnt down on Samrudhi highway, 26 lives were lost, Maharashtra was shaken, Buldhana Bus Accident latest update,

यवतमाळ येथील विदर्भ ट्रॅव्हल्सची बस क्र.MH29 BE1819 ही यवतमाळ येथून पुण्याकडे जात होती. समृद्धी महामार्गाच्या चॅनेल क्र.३३२ जवळ रात्री १.३० ते २ वाजण्याच्या दरम्यान बस चालकाचे नियंत्रण सुटून ही बस दुभाजकाला धडकून उलटली. यानंतर लगेच बसने पेट घेतला.

प्रवाशांचा आकांत ह्रदयाला पिळवटून टाकणारा

यावेळी पाच प्रवाशी व ट्रॅव्हल्सचे तीन कर्मचारी असे आठजण तात्‍काळ बसमधून बाहेर पडले. अन्य २६ प्रवाशी रात्रीच्या गाढ झोपेत असल्याने व बसने मोठा पेट घेतल्याने २६ प्रवाशांचा जळून घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघाताची बातमी कळल्यानंतर पोलीस, अग्नीशमन दल आदी यंत्रणा मदतीसाठी धावल्या. परंतू बसमध्ये आगीने रौद्र रूप धारण केल्‍याने सर्व हतबल झाले. ते बसमधील प्रवाशांना वाचवू शकले नाहीत. आगीत होरपळलेल्या प्रवाशांचा आकांत ह्रदयाला पिळवटून टाकणारा होता. आरोग्य विभाग व पोलीसांनी सर्व मृतदेह बुलढाणा येथे जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या शवागारात हलवले आहेत.

Buldhana Bus Accident, Akant of passengers is heart-wrenching, bus burnt down on Samrudhi highway, 26 lives were lost, Maharashtra was shaken, Buldhana Bus Accident latest update,

आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन

या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या आठ जणांवर देऊळगाव राजा येथील शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. मृतांची नावे मिळवण्याचे व ओळख पटवण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे. मृतांच्या नातेवाईकांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात मोबाईल क्र.7020435954 आणि 07262242683 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बुलढाणा बस अपघातातील जखमी व्यक्तींची नावे

चालक – शेख दानीश शे.ईस्माईल या.दारव्हा जि.यवतमाळ, क्लिनर – संदीप मारोती राठोड (३१) रा तिवसा, योगेश रामराव गवई रा. औरंगाबाद., साईनाथ चरमसिंग पवार (१९) रा माहूर, शशिकांत रामकृष्ण गजभिये या.पांढरकवडा, पंकज रमेशचंद्र रा.कांगडा (हिमाचल प्रदेश) या अपघातातील बसचा चालक व क्लिनर या दोघांना सिंदखेडराजा पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (Buldhana Bus Accident live news)

Buldhana Bus Accident, Akant of passengers is heart-wrenching, bus burnt down on Samrudhi highway, 26 lives were lost, Maharashtra was shaken, Buldhana Bus Accident latest update,

बुलढाणा बस अपघात नागपुरच्या पाच मृतांची ओळख पटली

बुलढाणा बस अपघातातील मृतांमध्ये नागपुरच्या पाच मृतांची ओळख पटली आहे. यामध्ये आयुष गाडगे, कौस्तूभ काळे, इशांत गुप्ता, गुडीया शेख, योगेश गवई यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली. विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बुकिंग कार्यालयातून पोलीस प्रवाशांची माहिती घेत आहे. इतर मृतांची ओळख पटवण्याचे कामे सुरु आहे.(Buldhana Bus Accident latest update)