Buldhana Bus Accident : बुलढाणा बस अपघातात 26 प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू , समृध्दी महामार्ग बनला मृत्यू महामार्ग

बुलढाणा, 1 जूलै 2023  : Buldhana Bus Accident : बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. समृध्दी महामार्गावर बसचा भीषण अपघात झाला. या घटनेत बस जळून खाक झाल्याने 26 प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू झाला. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.सिंदखेड राजा तालुक्यातील पिपळखूटा शिवारात आज पहाटे ही घटना घडली. (Buldhana Bus Fir)

26 passengers died in Buldhana bus accident, Samruddhi highway became death highway, Buldhana bus accident latest update today

जागपूरकडून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या विदर्भ ट्रॅव्हलला (क्रं. MH29 BE1819) भीषण अपघात होऊन आग लागल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार ट्रॅव्हलमध्ये २९ प्रवासी व ट्रॅव्हलचे तीन कर्मचारी होते. यापैकी सात ते आठ प्रवासी बाहेर पडले. तर २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही घटना आज पहाटे 2 च्या सुमारास घडली.

घटनास्थळी पोलीस, आरोग्य, महसूलसह इतर शासकीय यंत्रणा उपस्थित असून बचावकार्य सुरु आहे. तसेच प्रवाशांची नावे मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती बुलढाण्याच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना व्यक्त करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. (Buldhana Bus Accident)

दुर्घटनेची माहिती कळताच तातडीने महामार्गासाठी तैनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक तसेच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी बचावकार्य सुरु केले. जखमी प्रवाशांना काढून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.