Big political earthquake in Maharashtra next week? | शिवसेना राष्ट्रवादीचे मिशन सर्जिकल स्ट्राईक : महाराष्ट्रात पुढच्या आठवड्यात होणार मोठा राजकीय भूकंप ?

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याचा खरा अर्थ तर वेगळाच

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | Big political earthquake in Maharashtra next week? देशात राजकीय भूकंपाचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. गल्ली ते दिल्ली राजकीय भूकंपाचे हादरे बसु लागले आहेत.त्यातच आता राज्यात मोठा राजकीय भूकंप घडवण्याची तयारी शिवसेना व राष्ट्रवादीने हाती घेतली आहे.

पुढच्या आठवड्यात भाजपातील आमदारांचा एक गट पक्षांतर करणार असल्याची जोरदार चर्चा राज्यात सुरू झाली आहे.महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादीकडून सर्जिकल स्ट्राईक केला जाणार अशी चर्चा रंगली आहे. खरचं हा भूकंप होणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

भाजपला मोठं खिंडार पाडण्याची तयारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. भाजपच्या काही आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर काही आमदार हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने मोठी रणनीती आखली असल्याचं बोललं जात आहे.भाजपच्या काही आमदारांचा पुढील आठवड्यात शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश (BJP Mla may join NCP in presence of Sharad Pawar) होणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Big political earthquake in Maharashtra next week? )

Big political earthquake in Maharashtra next week?

काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तर काही आमदारांनी स्थानिक परिस्थिती पाहता शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता भारतीय जनता पक्षातील हे आमदार कोण आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चंद्रकांत पाटलांनी दिले होते राजकीय भूकंपाचे संकेत

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘माजी मंत्री म्हणू नका दोन तीन दिवसांत कळेल’ असा अल्टिमेटम पुण्याच्या एका कार्यक्रमात दिला होता. तेव्हा राज्यात ‘ऑपरेशन लोटस’ तर सुरू झाले नाही ना ? अशी शंका व्यक्त केली जात होती. पण दोन दिवस उलटून गेले तरी चंद्रकांत पाटलांच्या त्या विधानावर अजुन तरी कुठलीच मोठी राजकीय घडामोड घडलेली दिसत नाही.

चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांचे प्रतिउत्तर

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला होता. अगामी 25 वर्षे चंद्रकांत पाटलांनी माजी मंत्री ऐकुण घ्यायची सवय लावावी. महाविकास आघाडी भक्कम आहे. हे सरकार 25 वर्षे टिकेल असे सांगत चंद्रकांत पाटील आमचे मित्र आहेत. त्यांना नागालॅंड च्या राज्यपालपदाची ऑफर पक्षाने दिली आहे अशी आमची माहिती आहे. म्हणूनच ते कदाचित बोलले असतील की माजी मंत्री म्हणू नका असा खोचक टोला लगावला होता.

मुख्यमंत्र्यांच्या विधानाने पुन्हा सेना भाजप युतीची चर्चा

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी औरंगाबाद दौऱ्यातील एका कार्यक्रमात ‘भावी सहकारी’ असा उल्लेख करत राजकीय  वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर राज्यात पुन्हा सेना भाजप युती होणार अशी चर्चा रंगली होती.

मुख्यमंत्र्याच्या त्या विधानावरुन भाजपमधून संमिश्र प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या औरंगाबादमधील भाषणातील ‘भावी सहकारी’ या विधानावर भाजपच्या गोटातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. सर्वच नेत्यांनी सावध विधाने केली.

चंद्रकांत पाटलांचे विधान ते मुख्यमंत्र्यांचे विधान

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानानंतर लागलीच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात सेना भाजप युतीची जोरदार हवा रंगली होती. माध्यमांतून तर यासंबंधी बातम्यांचा धडका सुरू झाला होता.

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा खरा अर्थ तर वेगळाच

एकुणच राज्यात सुरू असलेल्या सेना भाजप संघर्षाला आता वेगळे वळण लागले आहे. सेनेने राष्ट्रवादीच्या साथीने भाजपच्या गडाला मोठा दणका देण्याचे निश्चित केले असल्याचे आता बोलले जात आहे. पुढील आठवडाभरात भाजपचे अनेक आमदार सेना व राष्ट्रवादीत जाणार असल्याचे बोलले जात असल्याने मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादेत केलेल्या ‘भावी सहकारी’ या वक्तव्याचा खरा अर्थ आता समोर आला आहे. (Big political earthquake in Maharashtra next week?)

राज्यात खरचं राजकीय भूकंप होणार का ?

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार अश्या वल्गना सातत्याने भाजपकडून होत आहेत. दोन वर्षात फक्त हीच हवा पेरली गेली आहे. त्यातच  ईडीकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिल्या जाणाऱ्या त्रासातून मुक्तता व्हावी याकरिता सेना राष्ट्रवादीने मास्टर प्लॅन आखत भाजपच्या आमदारांचा मोठा गट फोडून भाजपची ताकद कमी करण्याचे मनसुबे आखल्याचे बोलले जात आहे. राजकीय वर्तुळात जी चर्चा सुरू आहे ती खरी ठरल्यास भाजपला हा सर्वात मोठा धक्का असेल. तूर्तास राजकीय भूकंप कधी व कोठे व कसा होणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.