Big Breaking News । ऊर्जा राज्यमंत्री  प्राजक्त तनपुरे कोरोना पॉझिटिव्ह । Minister of State for Energy Prajakt Prasadrao Tanpure Corona Positive

Big Breaking News | जामखेड टाईम्स वृत्तसेवा ।राज्यात बुधवारी कोरोना रूग्णांच्या संख्येने दुपटीने वाढ झाली तसेच ओमिक्रॉनचेही रूग्ण राज्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत यामुळे राज्याच्या चिंता वाढलेल्या असतानाच राज्य मंत्रिमंडळातील मंत्रीही कोरोना पॉझिटिव्ह निघू लागल्याने राज्य सरकारसमोर नवं संकट उभं ठाकलं आहे. (Minister of State for Energy Prajakt Prasadrao Tanpure Corona Positive)

दोन दिवसांपुर्वी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड कोरोनाबाधित School Education Minister Varsha Gaikwad Corona Positive)  आढळून आल्या होत्या. त्यापूर्वी भाजपच्या विदर्भातील एका आमदारासह विधानसभा आणि मंत्रालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले होते. हिवाळी अधिवेशनात कोरोनाचा शिरकाव झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.

त्यातच बुधवारी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule Corona Positive)आणि त्यांचे पती सदानंद सुळे (Sadanand Sule Corona Positive) हे दोघे कोरोनाबाधित आढळून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत आपण कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे म्हटले होते.

त्यानंतर राज्य मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची बाधा झाल्याचे बुधवारी रात्री उशिरा स्पष्ट झाले. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. स्वता: तनपुरे यांनी यासंबंधीची माहिती ट्विटरवरुन रात्री उशिरा  दिली आहे. (Minister of State for Energy Prajakt Prasadrao Tanpure Corona Positive)

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तब्येत व्यवस्थित आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली काळजी घ्यावी. कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार सुरू करावेत ही विनंती असे ट्विट दोन तासापूर्वी केले आहे.

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister of State for Energy Prajakt Prasadrao Tanpure) हे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत. माजी खासदार प्रसाद तनपुरे हे मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे वडील आहेत. अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात तनपुरे कुटूंबाला मानाचे स्थान आहे.

तनपुरे कुटुंबाच्या दुसर्‍या पिढीचे राजकीय वारसदार म्हणून प्राजक्त तनपुरे हे राज्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. सध्या राज्यात मंत्रीमंडळात ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री म्हणून कारभार करत आहेत. अतिशय शांत, संयमी अभ्यासू तरूण राजकारणी म्हणून प्राजक्त तनपुरे राज्याच्या राजकारणात ओळखले जातात.

राज्यात कोरोनाची काय स्थिती ?

राज्यात बुधवार अखेर सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 14 हजार 65 इतकी आहे.  सर्वाधिक 8 हजार 60 सक्रीय रूग्ण मुंबईमध्ये आहेत. तर सर्वात कमी रूग्ण धुळे ( 2 रूग्ण) , नंदुरबार (4 रूग्ण), जळगाव (9 रूग्ण) या तीन जिल्ह्यात आहेत. बुधवारी दिवसभरात राज्यात 3 हजार 900 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी आढळून आलेल्या रूग्णांच्या दुप्पट रूग्ण बुधवारी दिवसभरात आढळून आले यामुळे राज्याच्या चिंता वाढल्या आहेत.

तर दुसरीकडे ओमिक्रॉनचाही बुधवारी राज्यात विस्फोट झाला. दिवसभरात 85 नवे ओमिक्रॉन रूग्ण राज्यात आढळून आले. राज्यात बुधवारी दिवसभरात एकुण 1 हजार 306 रूग्ण बरे होऊन घरी परतले तर 20 कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात बुधवार अखेर 1 लाख 22 हजार 906 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 905 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात बुधवारी आढळून आलेले ओमिक्रॉन रूग्ण खालील प्रमाणे

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (NIV) अहवालात आढळून आलेल्या 47 ओमिक्रॉन रुग्णांमध्ये मुंबई 34, नागपुर 03, पिंपरी-चिंचवड 03, नवी मुंबई 02, पुणे मनपा 02, पनवेल 01, कोल्हापूर 01, बुलढाणा 01 यांचा समावेश आहे. यातील 43 रूग्णांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास आहे. तर चौघे जण निकट सहवासित आहेत.

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) अहवालात आढळून आलेल्या 38 रुग्णांमध्ये मुंबई 19, कल्याण डोंबिवली 05, नवी मुंबई 03, पिंपरी-चिंचवड 03, वसई विरार 02, पुणे मनपा 02, पुणे ग्रामीण 01, भिवंडी निजापुर 01, पनवेल 01, ठाणे मनपा 01 या रूग्णांचा समावेश आहे. या सर्व रूग्णांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा संबंध नसल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक माहितीमुळे ओमिक्रॉनचा कम्युनिटी स्प्रेड ( समुदाय संसर्ग) सुरू झाल्याचे संकेत मिळाले आहेत. राज्यात बुधवार अखेर 252 ओमिक्रॉन रूग्णांची संख्या झाली आहे. यातील 99 रूग्णांच्या RTPCR रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने घरी सोडून देण्यात आलेले आहे.

राज्यात आजवर आढळलेले ओमिक्रॉन रूग्ण खालील प्रमाणे

मुंबई 137, पिंपरी-चिंचवड 25, पुणे ग्रामीण 18, पुणे मनपा 11, ठाणे मनपा 8, नवी मुंबई 07, पनवेल 07, कल्याण डोंबिवली 07, नागपुर 06, सातारा 05, उस्मानाबाद 05, वसई विरार 03, औरंगाबाद 02, नांदेड 02, बुलढाणा 02, भिवंडी-निजामपूर मनपा 02, लातूर 01,अहमदनगर 01, अकोला 01, मिरा भाईंदर 01, कोल्हापूर 01 असे 252 ओमिक्रॉन रूग्ण राज्यात आढळून आले आहेत. यात 09 विदेशी नागरिकांचा समावेश आहे.