गरिबी वाईट असते, पण ती जीवघेणी होते तेव्हा… (A helping hand to a Young man battling cancer)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: श्रीगोंदा तालुक्यातील एका छोटया गावातून सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ‘तो’ पुण्यात आला… नामांकित महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले… खर्च भागवण्यासाठी मिळेल ते काम; वेळप्रसंगी रात्रपाळीला सुरक्षा रक्षकाचे काम व दिवसा अभ्यास केला… ज्या उददेशाने तो पुण्यात आला त्यासाठी म्हणजेच स्पर्धा परिक्षेची तयारी सूरू केली, मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते… त्याला रक्ताचा कर्करोग (Blood Cancer) असल्याचे निदान झाले असून सध्या त्याच्यावर मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये (Tata Memorial Hospital Mumbai) उपचार सूरू आहेत. त्याला आता आर्थिक मदतीची गरज आहे. (A helping hand to a young man battling cancer)

युनूसचे बँक खाते तपशील
Yunus Munir Sayyad
Bank Details
ICICI branch, Daund, Pune
Ac No. 172301001144
IFSC ICIC0001723
Google pay – 7304928897
Phone pay – 7304928897

battling cancer, Tata Memorial Hospital Mumbai, Jamkhed Times, Younus Sayyad news, blood cancer,  Ahmednagar, pune, Ferguson College pune, Maharashtra,  Shrigonda, kothul,helping hand,

अहमदनगर जिल्हयातील श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ गावातील गरीब कुटूंबातल्या 25 वर्षीय युनूस सय्यदने पदवीचे शिक्षण पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयातून ( Ferguson college pune) पुर्ण केले. तो सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन होता. तशी तयारीही त्याने सूरू केली होती. घरचे असणारे अठरा विश्व दारिद्रय त्याच्या शिक्षणाच्या आड त्याने येऊ दिले  नाही. त्यासाठी दिवसभर कॉलेज; मिळेल ते काम ; वेळप्रसंगी रात्रीला सुरक्षा रक्षकाची नोकरी असा त्याचा दिनक्रम सूरू होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाची नोकरी कायम ठेवली आणि दिवसभर स्पर्धा परिक्षेची तयारी करत होता. 

battling cancer, Tata Memorial Hospital Mumbai, Jamkhed Times, Younus Sayyad news, blood cancer,  Ahmednagar, pune, Ferguson College pune, Maharashtra,  Shrigonda, kothul,helping hand

गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाउन पडले. त्यामुळे त्याच्या अडचणीत आणखीनच भर पडली. लॉकडाउन काळात तो गावी गेला मात्र त्याची तब्येत बिघडत होती. काय होतेय हे त्यालाही कळत नव्हते. एके दिवशी वेदना असहय झाल्याने दौंड येथील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी चाचण्या करायला लावल्या. चाचण्यांचा रिपोर्ट आल्यावर त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. ध्यानीमनी नसलेला ब्लड कॅन्सर म्हणजेचा रक्ताचा कर्करोग त्याला झाला असल्याचे निदान झाले. त्याच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात 18 लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. एव्हढे पैसे उभे करायचे तरी कसे असा प्रश्न युनूस व त्याच्या कुटूंबापुढे निर्माण झाला आहे. 

युनुसची आई दुस-यांच्या शेतात मोलमजुरी करून संसाराचा गाडा ओढते. तर युनूस आपल्याला मिळणा-या तुटपुंज्या पगारातून आईला काहीसा हातभार लावायचा. परंतू, आता अचानक समोर आलेल्या जीवघेण्या संकटाचा सामना कसा करायचा हा यक्षप्रश्न  सय्यद कुटूंबाला सतावत आहे. युनूसवर उपचार सुरू करण्यात आले. सुरवातीला सगे सोय-यांकडून आर्थिक मदत घेत रुग्णालयातील खर्च भागवला. मात्र, रुग्णालयात येणारा खर्च आवाक्याबाहेर असल्याने युनूसने आपल्या मित्रांना मदतीचा हात मागितला. त्यातील अनेकांनी मदत केली तर काहींनी फक्त आश्वासने दिली. खासगी रुग्णालयातील खर्च परवडणारा नसल्याने त्याने मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी तो दाखल झाला आहे. पहिल्या टप्प्यात आठ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी युनूसला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यासाठी समाजातील समाजभान असलेल्या दानशुर व्यक्तींनी सढळ हाताने त्याला मदत करावी, असे अवाहन प्रयोगवन परिवार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सत्तार शेख यांनी केले आहे.

गेले काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या युनूसने अनेक मित्रांना व नातेवाईकांना आर्थिक मदतीची याचना केली. त्यातील काहींनी मदतही केली मात्र ती अपुरी आहे. सगळेजण म्हणायचे काळजी घे. मात्र, पैशांची तजवीज कसा करतो असे कोणीही विचारत नाही. त्यामुळे ‘मी अजून जिवंत आहे’ असा संदेश त्याने जामखेड येथील प्रयोगवन परिवार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सत्तार शेख यांना पाठवला. ( Prayogwan Pariwar Samajik Sanstha Jamkhed) त्यानंतर सत्तार शेख यांनी युनूसला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सूरू केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, इतकेच पुरेसे नसून त्याला आणखीन मोठ्या मदतीची गरज आहे.