75th indian independence day 2021 : राष्ट्रगीत गातानाचा व्हिडीओ करा शासनाच्या वेबसाईटवर अपलोड , वाचा केंद्र सरकारची योजना
तुम्ही अपलोड केलेला व्हिडिओ दिसणार TV वर
नवी दिल्ली – भारतानं स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याला (75th indian independence day 2021) ७५ वर्ष पूर्ण होणार आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यात अविस्मरणीय ठरावा यासाठी भारत सरकारने एक योजना जाहीर केली आहे.
त्यानुसार प्रत्येक भारतीयाने स्वता:च्या आवाजात राष्ट्रगीत गातानाचा एक व्हिडीओ शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करायचा आहे. Every Indian wants to upload a video of the national anthem in their own voice on the government’s website.
कोरोना महामारीमुळे देशातील अनेक ठिकाणी निर्बंध सुरू आहेत. लोकं समुहाने एकमेकांना भेटू शकत नाहीत. सोशल डिस्टेसिंगचे पालन करणे गरजेचे आहे. परंतु अश्या परिस्थितीत देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह भारतीयांच्या मनात कायम रहावा याकरिता हटके पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे. स्वातंत्र्य दिनाचे बहुतांश सर्वच कार्यक्रम ऑनलाइन माध्यमातून होणार आहेत.
तमाम भारतीयांसाठी सर्वात मोठा दिवस असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांच्या सहभागाने साजरा केला जावा यासाठी प्रत्येक भारतीयाने राष्ट्रगीत गाताना एक व्हिडिओ शेअर करायचा आहे. (75th indian independence day 2021)
असा करा व्हिडिओ अपलोड आणि मिळवा प्रमाणपत्र
भारत सरकारच्या My Gov India च्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आलेल्या एका व्हिडीओमध्ये यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.लोक या उपक्रमात कशारितीने भाग घेऊ शकतात हे देखील सांगण्यात आलं आहे. हा व्हिडीओ वैयक्तिक किंवा सामूहिक रेकॉर्ड करून Rashtragaan.in या अधिकृत वेबसाइटवर वर नोंदणी करून त्यावर तुमचा व्हिडीओ अपलोड करण्याची प्रक्रिया सांगण्यात आली आहे. (75th indian independence day 2021)
राष्ट्रगीत गाताना रेकॉर्ड केलेला व्हिडीओ १५ ऑगस्ट २०२१ रोजी लाईव्ह प्रसारीत केला जाणार आहे. वेबसाईटवर दिलेल्या माहितीप्रमाणे, टीव्ही, रेडिओ, यूट्यूब आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लॉन्च होणाऱ्या राष्ट्रगीताच्या टॉप १० व्हिडीओची निवड केली जाणार आहे. (75th indian independence day 2021)
दरम्यान या उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना कुठल्याही भाषेत राष्ट्रगीत गाता येणार आहे. विशेषता: स्वता:च्या मातृभाषेतूनही राष्ट्रगीत गाऊ शकता. सदरचा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर सरकारकडून लगेचच सहभागी होणाऱ्याला ऑनलाईन प्रमाणपत्र दिले जाणार आहे. (75th indian independence day 2021)