जामखेड टाईम्स वृत्तसेवा : १५ ऑगस्टपासून संपुर्ण जिल्ह्यात कोरोना निर्बंधात शिथिलता येणार असल्याचे शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या आदेशाने आनंदात असलेल्या जामखेडकरांच्या चिंता वाढवणारी एक बातमी शुक्रवारी सायंकाळी धडकली आहे. सोमवारपासून बुधवारपर्यंत थंडावलेल्या कोरोनाने गुरूवारनंतर शुक्रवारीही मोठा दणका दिल्याने तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली आहे.
जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. १५ ऑगस्टपासून निर्बंध शिथिल होणार असल्याने बाजारपेठ उशिरापर्यंत सुरू राहिल. लग्नसोहळे दणक्यात होतील. पण वाढती रूग्णसंख्या पाहता मोठे संकट तर जामखेडवर चालून येत नाही ना ? अशी भीती आता सामान्यांमधून व्यक्त होऊ लागली आहे.
जामखेड तालुका आरोग्य विभागाने शुक्रवारी दिवसभरात ७६९ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या यामध्ये साकत ०२, हळगाव ०१, नानेवाडी ०३, गिरवली ०२, जवळा ०१ असे ०९ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर RTPCR अहवालात जामखेड शहर १३, भुतवडा ०१, वाघा ०१, जवळा ०४, शिऊर १२, मुंजेवाडी ०२, धोतरी ०२, बांधखडक ०१, अरणगाव ०१, जायभायवाडी ०१, हळगाव ०२, पिंपळगाव उंडा ०२, धनेगाव ०२, फाळकेवाडी ०१, काटेवाडी ०३, डिसलेवाडी ०२, मोहरी ०१, महारूळी ०१, भवरवाडी ०१, जवळके ०१, चौंडी ०१, असे ५५ तर इतर तालुक्यातील ०२ मिळून एकुण ५७ रूग्ण आढळून आले आहेत.
रॅपिड अँटीजेनमधील ०९ व RTPCR अहवालातील ५५ असे एकुण ६४ नवे कोरोनाबाधित रूग्ण शुक्रवारी दिवसभरात आढळून आले आहेत. शुक्रवारी कोरोनाने दिलेला दणका आता चिंता वाढवणारी ठरला आहे. दरम्यान शुक्रवारी दिवसभरात ५०७ नागरिकांचे RTPCR स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ संजय वाघ यांनी सायंकाळी माध्यमांशी बोलताना दिली.