MLA RohitPawar। रोहित पवारांच्या पाठीशी मी हिमालयासारखा उभा – Rural Development Minister Hasan Mushrif

खर्ड्यात सहा कोटी खर्चून उभारण्यात येणाऱ्या नवीन गोदामाचे भूमिपूजन

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी कोरोना महामारीच्या काळात उल्लेखनीय काम केले. कर्जत – जामखेड मतदारसंघाचा ( Karjat Jamkhed Constituency) विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या पाठीशी मी हिमालयासारखा उभा आहे असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. (Rural Development Minister Hasan Mushrif)

ग्रामविकासमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) हे शनिवारी (14 ऑगस्ट रोजी) जामखेड तालुका दौर्‍यावर होते. या दौर्‍यात त्यांच्या हस्ते तालुक्यातील खर्डा येथे सहा कोटी रूपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या वखार महामंडळाच्या तीन हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोडाऊन बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. ( Rural Development Minister and Ahmednagar District Guardian Minister Hasan Mushrif was on a tour of Jamkhed taluka on Saturday 14th August. During the visit, he inaugurated the construction of 3,000 metric tonne godown at Kharda in the jamkhed taluka at a cost of Rs. 6 crore)

यावेळी आमदार रोहित पवार (MLA RohitPawar), जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा दुय्यम निबंधक दिग्विजय आहेर, प्रांत अधिकारी डॉ अजित थोरबोले,अभियांत्रिकी महाव्यवस्थापक संजय इंदाने, सहकारी संचालक रमेश शिंगाडे, विभागीय व्यवस्थापक प्रशांत बारावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सभापती सुर्यकांत मोरे,तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात, जामखेडचे सहायक निबंधक देविदास घोडेचोर सह आदी उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच मंजूर भाई सय्यद यांनी पालकमंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Rural Development Minister Hasan Mushrif | पुढे म्हणाले की, वखार महामंडळाच्या गोडाऊनमुळे येथील शेतकरी व व्यापाऱ्यांना धान्य साठवणुकीसाठीची मोठी सोय होणार असल्याने त्याचा मोठा फायदा होणार आहे. आमदार रोहित पवार यांनी कोरोना काळात केलेले काम हे उल्लेखनीय असून ते सतत मतदारसंघात अनेक विकासाच्या योजना मार्गी लावण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत. कर्जत-जामखेड हा जिरायत भाग असून मागील काळातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या पाठीमागे मी हिमालया सारखा उभा आहे असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले.

यावेळी आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) व वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांचेही भाषण झाले. यावेळी सरपंच गोपाळघरे, उपसरपंच लोखंडे वखार महामंडळाचे उपव्यवस्थापक अभियांत्रिकी राजाराम अडगळे, राजेंद्र जाधव, कनिष्ठ अभियंता सुदर्शन कोंडाळकर, तुळशीराम मुळे, विशाल खळदकर, साई कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियरचे ए. पी.सिंग, प्रोजेक्ट मॅनेजर प्रवीण विभुते, नितीन लबडे,ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, पत्रकार संतोष थोरात, किशोर दुशी, दत्तराज पवार व खर्डा ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांनी केले. तर आभार नायब तहसिलदार नवनाथ लांडगे यांनी मानले.