MPSC मार्फत होणार १५००० पदांची भरती

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

मुंबई: 'एमपीएससी'मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्‍तपदांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले (१५००० posts will be recruited through MPSC ) त्यानुसार राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नोकर भरतीबाबतची मोठी घोषणा आज केली आहे.(Maharashtra government going to recruit vacant post, say dattatray bharane)

सरकारने 'एमपीएससी'मार्फत (MPSC) १५,५११ पदे भरण्यासाठी तयारी सुरु केली आहे.गट अ ते क पर्यंतच्या सर्व पदांवर हि भारती होणार आहे. यातून सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या पदभरतीच्या निर्बंधांतून सूट देण्यात आलेली आहे अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

गट अ ची १४१७ पदे गट ब ची ८०३१  पदे तसेच गट क ची ३०६३ पदे अशी एकूण १५५११ पदांवर नियुक्ती होईल वित्त विभागाने सन २०१८  पासून मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने या पदांचे आरक्षण तपासून पद भरती गतीने राबवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे, असं भरणे यांनी सांगितलं. (MPSC)

संघ लोकसेवा आयोगाकडून (UPSC) दरवर्षी पुढील संपूर्ण वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. त्याच धर्तीवर एमपीएससीच्या (MPSC) परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर करण्याबाबतचे निर्देशही देण्यात आले आहेत, अशी माहितीदेखील त्यांनी दिली. (Maharashtra government going to recruit 15 thousand vacant post, say dattatray bharane)

उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने मुलाखतींवर अवलंबून असलेली ०४ पदे रिक्त आहेत, जी भरणे गरजेचे आहे, त्यासाठी जुलै अखेर पर्यंत निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. याशिवाय केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सदस्यसंख्येत वाढ करण्याच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा करण्यात आली. जेणेकरुन भविष्यातील मुलाखती गतीने पार पाडता येतील, असं त्यांनी सांगितलं.