Dr Bhaskar more jamkhed : डाॅ भास्कर मोरेंच्या काळ्या करामतींचा निषेध नोंदवण्यासाठी जामखेड बंदची हाक !

Dr Bhaskar more jamkhed : रत्नदीप शैक्षणिक संकुलात शिक्षण घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण करणाऱ्या संस्थापक डाॅ भास्कर मोरेंविरोधात जामखेडमध्ये विद्यार्थ्यांचे आक्रमक आंदोलन सुरु आहे.भास्कर मोरेविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.मोरे हा फरार असून त्याला अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.फरार मोरे याला अटक करावी या मागणीसाठी तसेच डाॅ भास्कर मोरेच्या काळ्या करामतींचा निषेध नोंदवण्यासाठी जामखेड बंदची हाक देण्यात आली आहे. (Dr Bhaskar more jamkhed latest news today)

Dr Bhaskar More Jamkhed news today, Jamkhed bandh is called to protest Bhaskar More,

जामखेड येथील रत्नदीप शैक्षणिक संकुलातील शेकडो विद्यार्थ्यांनी संस्थापक भास्कर मोरेविरोधात आक्रमक अंदोलन हाती घेतले आहे.आज अंदोलनाचा आठवा दिवस होता. विद्यार्थ्यांच्या अंदोलनानंतर डाॅ भास्कर मोरे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याचबरोबर हरीण पाळल्यामुळे वनविभागानेही गुन्हा दाखल केला आहे. जामखेडमध्ये विद्यार्थ्यांचे अंदोलन अजूनही सुरूच आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनास विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी सक्रीय पाठींबा दिला आहे. (Dr Bhaskar more jamkhed latest news today)

विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच रत्नदीप शैक्षणिक संकुलाचा संस्थापक डॉ भास्कर मोरे हा फरार झाला आहे. दुसरीकडे शैक्षणिक मागण्यांची पूर्तता व्हावी व भास्कर मोरेला अटक करण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे.विद्यार्थ्यांच्या आंदोलनास पाठींबा म्हणून शिव प्रतिष्ठाण हिदुस्थानचे तालुकाध्यक्ष पांडूराजे भोसले यांचे उपोषण सुरु आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या या आंदोलनावर अजूनही ठोस तोडगा निघालेला नाही. (Dr Bhaskar more jamkhed latest news today)

shital collection jamkhed

भास्कर मोरेंच्या काळ्या करामतींनी जामखेड तालुक्याची बदनामी झाली आहे. रत्नदीप शैक्षणिक संकुलातील शेकडो विद्यार्थ्यांनी भास्कर मोरेंवर जे आरोप केले आहेत ते पाहता मोरे हा कॉलेज चालवत होता की छळछावणी असा सवाल आता विचारला जात आहे.भास्कर मोरेंकडून करण्यात आलेल्या अत्याचाराच्या सुरस कथा गावागावात चर्चिल्या जाऊ लागल्या आहेत. मोरेविरोधात महिला वर्गात संतापाचे वातावरण आहे. (Dr Bhaskar more jamkhed latest news today)

भास्कर मोरेला तातडीने अटक करावी या मागणीसाठी आंदोलक विद्यार्थी आणि शिव प्रतिष्ठाण हिदुस्थान तसेच समस्त जामखेडकरांच्या वतीने उद्या 13 रोजी जामखेड बंदचे आवाहन करण्यात आले आहे.भास्कर मोरेंच्या काळ्या करामतींचा निषेध नोंदवण्यासाठी सर्वांनी जामखेड बंद ठेऊन शालेय विद्यार्थ्यांच्या उपोषणाला जाहीर पाठींबा देऊन पालक म्हणुन जबाबदारी पार पाडावी असे आवाहन करण्यात आले. याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट टाकून आवाहन केले जात आहे. (Dr Bhaskar more jamkhed latest news today)

Dr Bhaskar More Jamkhed news today, Jamkhed bandh is called to protest Bhaskar More,