Jamkhed taluka administration | जामखेडला नवा गडी नवा राज : जामखेड तालुका प्रशासनात आले नवे कारभारी !

नव्या कारभाऱ्यांचा नवा 'डाव' दमदार होईल का ?

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | New officers came in Jamkhed taluka administration | जामखेड तालुका प्रशासनात अनेक नवे बदल झाले आहेत. महसुल, कृषी, पंचायत समिती या विभागांचे जुने कारभारी बदलून जामखेडला नवे कारभारी (officers) आले आहेत. आमदार रोहित पवारांच्या (MLA Rohit Pawar) नेतृत्वात या नव्या कारभाऱ्यांना काम करावे लागणार आहे. जामखेड तालुक्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी नवे कारभारी कसा कारभार करतात याची तालुक्याला उत्सुकता आहे.(New officers came in Jamkhed taluka administration)

जामखेडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी आपल्या कार्यकाळात केलेली कामगिरी लक्षवेधी ठरली होती. त्यांच्या बदली नंतर कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे (Tahsildar Yogesh Chandre) हे जामखेडला तहसीलदार म्हणून आले आहेत.तर तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी आष्टीला कृषी अधिकारी असलेले राजेंद्र सुपेकर (Agriculture Officer Rajendra Supekar) हे बदलून आले आहेत. तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांच्या बदली नंतर विदर्भात कार्यरत असलेले प्रकाश पोळ (Group Development Officer Prakash Pol) हे गटविकास अधिकारी म्हणून जामखेडला बदलून आले आहेत. (New officers came in Jamkhed taluka administration)

आमदार रोहित पवार यांच्या मागणीवरून तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना (officers) जामखेडला आणण्यात आले अशी चर्चा आहे. जामखेडला नव्याने बदलून आलेले तीनही नवे कारभारी आपल्या कामासाठी प्रसिध्द आहेत. कामाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे.(New officers came in Jamkhed taluka administration)

जामखेड तालुक्यात अवैध्य वाळू तस्करांचे मोठे रॅकेट आहे.या रॅकेटला सर्वच राजकीय पक्षांचा आशिर्वाद आहे.यावर कायमचा आळा घालण्याचे मोठे अव्हान नव्या तहसिलदारांसमोर असणार आहे. वाळू तस्करांच्या रॅकेटमध्ये महसुलमधील काही झारीतील शुक्राचार्यही सहभागी आहेत. त्यांचाही बिमोड करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर महसुलाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी नवा कार्यक्रम राबवण्याची गरज आहे. गावोगावचे तलाठी शेतकऱ्यांना वेठीस धरतात यावरही काम होणे आवश्यक आहे.New officers came in Jamkhed taluka administration

कृषी विभागातील अनागोंदी दुर करण्यासाठी नव्या कृषी अधिकाऱ्यांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. गावोगावचे कृषी सहाय्यक स्वता: तालुका कृषी अधिकारी असल्यासारखे वागत आहेत. गावखेड्यातील बळीराजाला वेठीस धरत आहेत. कृषी विभागाचा कारभार जनताभिमूख होण्यासाठी नव्या साहेबांना गावोगावी जाऊन शेतकरी संवादाचे कार्यक्रम राबवावे लागतील. कृषी योजना प्रभावी राबवाव्या लागतील. शेतकऱ्यांना नवी दिशा दाखवावी लागेल.New officers came in Jamkhed taluka administration

पंचायत समितीत सुध्दा अनेक गडबड घोटाळे आहेत. काही ग्रामसेवकांना शिस्त लावणे आवश्यक आहे.  ग्रामसेवकांच्या रिक्त जागा भरणे आवश्यक आहे. पंचायत समितीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. पंचायत समितीच्या इतर विभागाच्या कारभारात सुधारणा होणे आवश्यक आहे. तालुक्यातील ग्रामपंचायती सक्षम करण्यासाठी योजनाबध्द कार्यक्रम राबवण्यासाठी नवे बीडीओ पुढाकार घेतील अशी जनतेला अपेक्षा आहे.रोजगार हमीच्या कामातील खाबूगिरी रोखणे हे तीनही विभागाच्या नव्या कारभाऱ्यांसमोरील सर्वात मोठे अव्हान आहे.काम चुकारांना शिस्त लावणे हेही मोठे अव्हान असणार आहे.

जामखेड तालुक्यात भाजप विरूध्द राष्ट्रवादी असा संघर्ष आहे. जामखेड तालुक्यात राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांच्याकडून विविध प्रश्नांसाठी सातत्याने अंदोलने होतात. जामखेडला आलेले नवे कारभारी यासर्वांवर कसा समतोल साधतात हेही पहावे लागणार आहे.New officers came in Jamkhed taluka administration

जामखेड तालुक्याच्या सर्वागीण विकासासाठी नवे कारभारी निश्चितच दमदार कारभार करतील, सर्वसामान्य जनतेला न्याय देतील. अशी आशा आहे. नव्या कारभाऱ्यांना दमदार कामगिरीसाठी जामखेड टाईम्सच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

 

web taital : New officers came in Jamkhed taluka administration