- Advertisement -

दुसऱ्या दिवशीही नगरपरिषदेची थकबाकी वसुली मोहीम जोरात सुरू : दिवसभरात झाला इतक्या लाखांचा वसुल ! (On the second day also, the arrears recovery campaign of the Municipal Council started in full swing: so many lakhs were recovered in a day!)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड नगरपरिषदेने आठ कोटी रूपयांच्या थकबाकी वसुलीसाठी जोरदार मोहिम हाती घेतली आहे.मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी स्वता: थेट रस्त्यावर उतरत थकबाकीधारक गाळेधारकांवर कालपासुन कारवाई हाती घेतली आहे. आज दुसर्या दिवशी शुक्रवारीही सायंकाळपर्यंत नगरपरिषदेची वसुली मोहिम सुरूची होती. शुक्रवारी दिवसभरात तब्बल 03 लाख 62 हजार रूपयांची वसुली करण्यात नगरपरिषदेला यश आले.(On the second day also, the arrears recovery campaign of the Municipal Council started in full swing: so many lakhs were recovered in a day!)

काल नगरपरिषदेने शहरातील चार गाळे सील करण्याची कारवाई केली होती.  काल व आज सायंकाळी उशिरापर्यंत वसुलीची कारवाई सुरू होती. काल दीड लाख व आज 03 लाख 62 हजार रूपये नगरपरिषदेने वसुल केले. त्यानुसार दोन दिवसांत तब्बल पाच लाख अकरा हजार रूपये वसुल करण्यात नगरपरिषदेला यश आले आहे. या कारवाईच्या पथकात मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते,विष्णू भिसे, रामराव नवगिरे, राजेंद्र गायकवाड, अविनाश साबळे, सिद्धेश मुळे, अतुल कोकाटे, अभिजित भैसाडे, प्रमोद टेकाळे, लक्ष्मण माने, निवृत्ती चव्हाण, विजय  पवार, संजय खेत्रे, उमेश राऊत, हितेश वीर, रज्जाक शेख, राम नेटके, संतोष अडाले, सय्यद वली, ऐयाज शेख सह आदी कर्मचार्यांचा समावेश आहे.