Heavy Rains | शुक्रवारी मध्यरात्री रंगला विजांचा थरार : जामखेड तालुक्यात पावसाची हजेरी

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : जामखेड तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री विजांचा थरार रंगला होता. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटाने अनेक भागातील आसमंत दुमदुमून गेला होता.

शुक्रवारी सायंकाळ पासुनच जामखेड तालुक्यात पावसास सुरूवात झाली होती. काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला. मात्र सायंकाळनंतर अकाशात ढगांची मोठी गर्दी झाली होती. विजांच्या कडकडाटाने आसमंत दुमदुमून गेला होता.

रात्रभर अकाशात विजांचा कडकडाट सुरू होता. मध्यरात्रीनंतर तालुक्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

तालुक्यात कुठे विज कोसळल्याची वा कुठलीही हानी झाल्याचे सध्या तरी वृत्त नाही.

तालुक्यातील  जवळके, खुरदैठण, हळगाव, पिंपरखेड, नान्नज, जवळा, आघी, चौंडी या भागात जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. तर खर्डा भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचे वृत्त आहे.

शुक्रवारी रात्रभर तालुक्यातील इतर भागात नेमका कसा पाऊस झाला ? याबाबतची सविस्तरमाहिती मिळताच बातमी अपडेट केली जाईल.