- Advertisement -

लाडक्या लेकीच्या विवाहानंतर माजी मंत्री राम शिंदे झाले भावूक !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  राज्याचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांची जेष्ठ कन्या डॉ. अक्षता शिंदे ही आज विवाह बंधनात अडकली. तिचा विवाह मंगळवेढा तालुक्यातील बावची गावचे रहिवासी असलेले कुंडलीक नारायण खांडेकर यांचे सुपुत्र श्रीकांत यांच्याशी पार पडला. श्रीकांत हे आयएएस अधिकारी आहेत. काही वेळापुर्वी स्वता: राम शिंदे यांनी हळदी व विवाह समारंभाचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. पोस्ट शेअर करताना राम शिंदे भावूक झाले आहेत. त्यांनी फेसबुक पोस्ट द्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत .माजी मंत्री राम शिंदे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात कि,

“हळद अंगाला लागली
शालू रुपेरी ल्याली
बोहल्यावर जाताना अक्षता
आशिर्वादात न्हाली”

अशी फेसबुक पोस्ट लिहीत राम शिंदे यांनी आपल्या लाडक्या लेकीच्या हळदी व विवाह समारंभाचे वर्णन केले आहे.

पहा राम शिंदे यांच्या लाडक्या लेकीच्या हळदी व विवाह समारंभाचे फोटो

माजी मंत्री राम शिंदे यांची फेसबूक पोस्ट
माजी मंत्री राम शिंदे यांची फेसबूक पोस्ट