राम शिंदे व रोहित पवार यांच्यातील राजकीय कटुता होऊ लागली दुर ?

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) भाजपाचे नेते माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांच्या मुलीचा विवाह सोहळा नुकताच पुण्यात पार पडला. (Rohit pawar visit ram shinde’s together widding) या विवाह सोहळ्याला राज्याच्या राजकारणातील बड्या नेत्यांनी हजेरी लावली खरी पण यात सर्वाधिक लक्षवेधी भेट ठरली ती आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या उपस्थितीची. पवार व शिंदे हे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात.  कर्जत – जामखेड मतदारसंघात (Karjat-Jamkhed constituency) दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सतत संघर्ष उफाळून येत असतो परंतू राजकारणाच्या पलिकडे जाऊन पवार व शिंदे यांच्यातील व्यक्तीगत संबंध आता ‘मधुर’ बनत चालल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. रोहित पवारांची उपस्थिती आता राज्यात चर्चेत आली आहे.

भाजपा नेते राम शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यात आमदार रोहित पवार यांची लावलेली हजेरी.

विधानसभा निवडणुकीपासून राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात टोकाचे राजकीय मतभेद आहेत. असे असले तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र त्याचं उत्तम जुळतं हेच या लग्न सोहळ्यातील आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीने दाखवून दिलं आहे. शिंदे व पवार यांच्यात निर्माण होऊ लागलेले मधूर संबंध अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरू लागले आहेत. या मधूर संबंधाची साखर पेरणी अंबालिका साखर कारखान्यावरील त्या ‘कथीत’ भेटीत तर झाली नव्हती नाही ना ? अशी शंका आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आहे.

भाजपा नेते राम शिंदे यांच्या मातोश्रींचे आशिर्वाद घेताना आमदार रोहित पवार

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. टीका टिपण्णी आणि आरोप प्रत्यारोपांनी कर्जत जामखेडची निवडणूक गाजली होती. रोहित पवार यांनी निवडणुकीतील सर्व मतभेद बाजूला ठेवून, विजयानंतर राजकीय सभ्यतेचं दर्शन घडवलं होतं. रोहित पवार यांनी विजय मिळवल्यानंतर राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. इतकंच नाही तर राम शिंदे यांच्या मातोश्रींच्या पाया पडून त्यांचेही आशीर्वाद रोहित पवार यांनी घेतले होते. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. मतदारसंघात दोन्ही नेत्यांचा संघर्ष सतत उफाळून येत आहे.

परंतू राम शिंदे यांच्या कन्येच्या विवाहाचे औचित्य साधून आमदार रोहित पवार यांनी शिंदे कुटूंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राम शिंदे यांच्या आईंची आवर्जून भेट प्रकृतीची विचारपूस केली व आशिर्वाद घेतले.राम शिंदे व रोहित पवार यांच्यातील राजकीय कटुता आता दुर होऊ लागल्याचा संदेश यानिमित्त जनतेत गेला आहे. दोन्ही पक्षातील राजकीय कार्यकर्त्यांनी टोकाचे मतभेद सोडून व्यक्तीगत संबंध जपावेत हाच संदेश पवार व शिंदे यांच्या भेटीतून कार्यकर्त्यांनी घेणे आवश्यक आहे.

या लग्न सोहळ्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रोहित पवार यांचीही यावेळी आमनेसामने भेट झाली. दोघांनी हसतमुखाने एकमेकांना नमस्कार केला.

माजी मंत्री राम शिंदे यांची कन्या डॉ.अक्षता शिंदे यांचा विवाह आयएएस अधिकारी श्रीकांत खांडेकर यांच्याशी पुण्यात पार पाडला. या विवाह सोहळ्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्याचे दोन्ही विरोधीनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, भाजपा नेत्या पंकजाताई मुंढे व त्यांचे पती, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, आ.गोपीचंद पडळकर,भाजपा नेते  हर्षवर्धन पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, बाळा भेगडे, यांच्यासह अनेक दिग्गज नेते मंडळींनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. (Former Minister Ram Shinde’s daughter Dr. Akshata Shinde got married to IAS officer Shrikant Khandekar in Pune.BJP state president Chandrakant Patil, state opposition leaders Devendra Fadnavis, Pravin Darekar, BJP leader Pankajatai Mundhe and her husband, NCP MLA Rohit Pawar, MLA Gopichand Padalkar, BJP leader Harshvardhan Patil, Rashtriya Samaj Party president Mahadev Jankar and Bala Bhegade were present on the occasion. Many veteran leaders were present and greeted the bride and groom.)