KYC Internet Banking Fraud | केवायसीपासून सावध राहा अन्यथा तुमचे बँक खाते रिकामे होईल

भारतीय स्टेट बँकेने देशातील खातेदारांना केले सावध

मुंबई: कोरोनामुळे देशातील नागरिक मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. तर दुसरीकडे इंटरनेटच्या मायावी दुनियेत सायबर गुन्हेगारीचे (Cyber ​​Crime) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. (KYC Internet Banking Fraud) सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या वेगवेगळ्या माध्यमांतून नागरिकांची फसवणूक करत असल्याचे समोर येत आहे. सायबर गुन्हेगारांनी देशातील मोठ्या बँकांच्या ग्राहकांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.

केवायसी अपडेट (KYC Update) च्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक फसवणूक होत आहे. (KYC Internet Banking Fraud) हे प्रकार समोर आल्यानंतर देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने (Bhartiy state Bank) आपल्या ग्राहकांना सावध केले असुन यासंंदर्भात काही महत्वाच्या सुचना जारी केल्या आहेत.

अशी होते फसवणुक – KYC Internet Banking Fraud
आजकाल फसवणूक, फिशिंग आणि स्मिशिंगद्वारे लोकांच्या खात्यातून पैसे उडवले जातात. (Internet Banking Fraud) विशिंगमध्ये एका ग्राहकाला फोन कॉलद्वारे गुंतवले जाते. त्याला माहिती विचारली जाते. आधी त्याला लोभ देऊन गोवले जाते, नंतर माहिती घेतली जाते. फसवणूक करणारे बँकेचे कर्मचारी असल्याचे भासवून प्रश्नोत्तरे करतात. (Fraud, phishing and smashing)

स्टेट बँकेने जारी केलेल्या सुचना खालील प्रमाणे
1) फोन कॉल, मेसेज किंवा ईमेलद्वारे कधीही जन्म तारीख, डेबिट कार्ड नंबर, इंटरनेट बँकिंग यूजर आयडी, पासवर्ड, डेबिट कार्ड पिन, सीव्हीव्ही, ओटीपी इत्यादी माहिती देऊ नका.

2) फसवणूक करणारे एसबीआय, आरबीआय, सरकारी कार्यालय, पोलीस किंवा केवायसी अधिकारी म्हणून उपस्थित राहून कॉल किंवा मेसेज किंवा ईमेल करू शकतात. अशा लोकांना तुमची कोणतीही माहिती देऊ नका.

3) आपल्या मोबाईल फोनमध्ये कोणत्याही अज्ञात लिंकवरून कोणतेही ॲप डाऊनलोड करू नका. असे ॲप्स दूरध्वनी कॉल आणि ईमेलवर आधारित असू शकतात जे टाळणे आवश्यक आहे.

4) जर एखादा मेसेज किंवा ईमेल अज्ञात लिंककडून आला असेल आणि त्यावर लिंकवर क्लिक करा असे सांगितले जात असेल तर अजिबात क्लिक करून नका.

5) फोनवर भ्रामक मेसेज किंवा ऑफर येऊ शकतात. असे मेसेज आकर्षक असतील पण त्याचे परिणाम धोकादायक असू शकतात. असे मेसेज ग्राहकांना ईमेल, एसएमएस किंवा इतर सोशल मीडियाद्वारे पाठवले जातात या मॅसेजकडे दुर्लक्ष करा.

फसवणुक टाळण्यासाठी या ठिकाणी करा तक्रार 

एका ग्राहकाने SBI ला ट्विट करत मला एक संदेश प्राप्त झाला आहे, त्यात म्हटले आहे की तुमचे SBI खाते स्थगित केले जाईल. अशा परिस्थितीत तुमच्या खात्याचे केवायसी अपडेट करा, यासोबत एक लिंक शेअर केलीय हे खरं आहे का अशी विचारणा केली आहे.

त्यावर त्या ट्विटला उत्तर देताना एसबीआयने म्हटले आहे की, जर अशा कोणत्याही खातेधारकाला असे ईमेल, एसएमएस, फोन कॉल प्राप्त होत असतील आणि कोणतीही लिंक एकत्र शेअर केली जात असेल, तर अशा फोन कॉल आणि मेसेजपासून (KYC Internet Banking Fraud) सावध राहा. बँकेने आपल्या ग्राहकांना असे कॉल किंवा मेसेजमध्ये त्यांचे वैयक्तिक तपशील शेअर करू नये, असे आवाहन केलेय. विशेषतः वापरकर्ता आयडी, पासवर्ड, डेबिट कार्ड नंबर, पिन, सीव्हीव्ही, ओटीपी अजिबात शेअर करू नका.

या व्यतिरिक्त एसबीआयने म्हटले आहे की, जर तुम्हालाही असे मेसेज आले तर तुम्ही [email protected] वर मेलद्वारे तक्रार करू शकता. किंंवा हेल्पलाईन नंबर 155260 वर करू शकता. तसेच स्थानिक अंमलबजावणीकडे देखील तक्रारी केल्या जाऊ शकतात. KYC Internet Banking Fraud