BCCI : सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये रंगणार आयपीएलचा पुढील थरार !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांबाबत बीसीसीआयने आज महत्वाची घोषणा केली आहे. आयपीएलचा उर्वरित हंगाम यूएईत ( IPL- UAE) होणार असून सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात हे सामने खेळवण्यात येतील अशी घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली आहे.

भारतातील पावसाळ्याचा विचार करता बीसीसीआयने उर्वरित हंगाम यूएईत हलवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. कोरोनामुळे यंदाची आयपीएएल स्पर्धा 29) सामन्यांनंतर स्थगित करण्यात आली होती.

आज बीसीसीआयची विशेष बैठक घेण्यात आली. यात सदस्यांनी आयपीएल पुन्हा सुरू करण्यास एकमताने सहमती दर्शविली. बीसीसीआय’ टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन भारतातच करण्यासाठी उत्सुक आहे. येत्या १ जूनला होणारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) कार्यकारी परिषदेची बैठक निर्णायक ठरणार आहे; परंतु भारतामधील कोरोनाची स्थिती पाहून आणखी काही महिन्यांनी आढावा घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंती बीसीसीआयकडून करण्यात आली आहे.