Mobile thief arrested in Choundi | चौंडीच्या मोबाईल चोराला जामखेड पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Mobile thief arrested in Choundi |  जामखेड तालुक्यातील हळगाव येथून मोबाईलची चोरी करणाऱ्या चौंडीतील एका तरुणास जामखेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील हळगाव नुकतेच एक आरोग्य शिबिर पार पडले. या शिबीरासाठी आलेल्या ॲब्युलन्समधील ड्रायव्हर गावातील एका हाॅटेलवर नाश्त्यासाठी गेला होता. तिथेच त्याचा 30 हजार रूपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल गहाळ झाला होता.

या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला ॲब्युलन्स ड्रायव्हर सागर वसंत जाधव ( रा पंढरपूर) याने फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात  कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी वेगाने तपास करत सदर मोबाईल हा चौंडी येथील दीपक रामचंद्र ढवळे याच्याकडे मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. पुढील तपास पोलिस नाईक अजय साठे हे करत आहेत.

Mobile thief arrested in Choundi

ही कारवाई पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात, पोलिस नाईक अविनाश ढेरे, अरूण पवार, आबासाहेब आवारे, विजयकुमार कोळी यांनी केली.