खळबळजनक : विवाहापूर्वी प्रेमसंबंधातून जन्मलेल्या नवजात बालकाची हत्या, तिघा जणांविरूध्द खुनाचे गुन्हे दाखल, जामखेड तालुक्यात उडाली खळबळ, खर्डा पोलिसांची मोठी कामगिरी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विवाहापूर्वी प्रेमसंबंधातून जन्मलेल्या नवजात बालकाची हत्या (newborn child Murder) करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.खर्डा पोलिस स्टेशन (Kharda Police Station) अंतर्गत नायगाव (Naigaon) गावात ही घटना घडली आहे.या प्रकरणात खर्डा पोलिसांनी तिघा जणांविरोधात खुनाचे गुन्हे दाखल केले आहेत.आरोपींमध्ये एका मयताचा समावेश आहे.आत्महत्येच्या (suicide) तपासात नवजात बालकाच्या हत्येचा खर्डा पोलिसांनी उलगडा केला आहे.मानवतेला काळिमा फासणार्‍या या घटनेमुळे जामखेड तालुका हादरून गेला आहे. (Naigaon Murder Case)

Sensational, murder of newborn child born out of pre-marital relationship, murder cases filed against three persons, excitement in Jamkhed taluka, jamkhed crime news today,

जामखेड तालुक्यातील खर्डा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नायगाव येथील 27 वर्षीय हरिश्चंद्र राजेंद्र जाधव (Harishchandra Rajendra Jadhav) या तरूणाने काही दिवसांपुर्वी आत्महत्या (suicide) केली होती. आत्महत्येपुर्वी त्याने सुसाईड नोट लिहली होती. या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला गुरनं.146/2023 भादवि कलम 306, 506 34 प्रमाणे 29 जूलै 2023 रोजी गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा खर्डा पोलिसांनी कसून तपास केला असता या प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

या प्रकरणातील मयत हरिश्चंद्र जाधव व सविता जाधव या दोघांमध्ये प्रेमसंबंध (love affair) होते.विवाहापूर्वीच सविता हि गरोदर होती.16 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांना एक मुलगा झाला होता. मुलाची आई सविता कैलास जाधव (Savita Kailas Jadhav), मुलाचा मयत बाप हरिश्चंद्र राजेंद्र जाधव व मयताची आई विमल राजेंद्र जाधव (Vimal Rajendra Jadhav) या तिघांनी नायगाव शिवारातील मारूती बहिर यांच्या गट नंबर 46 मधील एका विहीरीत खड्डा खोदून सदर नवजात बालकास जिवंत पुरले होते. अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

खर्डा पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल

याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर यांच्या फिर्यादीवरून सविता कैलास जाधव, राहणार दौंडाचीवाडी तालुका जामखेड, हरिश्चंद्र राजेंद्र जाधव (मयत) व ३.विमल राजेंद्र जाधव दोघे राहणार नायगाव तालुका जामखेड या तिघांविरुद्ध खर्डा पोलीस स्टेशन गुरनं.157/ 2023 भादवी कलम 302,201,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करत आहेत.

आत्महत्येच्या तपासात नवजात बालकाच्या हत्येचा उलगडा

नायगाव येथील तरूण हरिश्चंद्र राजेंद्र जाधव याच्या आत्महत्येचा तपास करत असलेल्या खर्डा पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता नवजात बालकाच्या हत्येची उकल झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर (API Mahesh Jankar) व त्यांच्या टीमने केलेल्या सखोल तपासामुळे नवजात बालकाच्या हत्येचा उलगडा झाला आहे. ‘पोलिस के हात बहूत लंबे होते है’ हेच या प्रकरणातून अधोरेखित झाले आहे.

आरोपींनी नवजात बालकाला जिवंत पुरून पुरावा केला नष्ट

सविता कैलास जाधव, राहणार दौंडाचीवाडी तालुका जामखेड, हरिश्चंद्र राजेंद्र जाधव (मयत) व ३.विमल राजेंद्र जाधव दोघे राहणार नायगाव तालुका जामखेड या तिघा आरोपींनी 16 फेब्रुवारी 2022 रोजी नायगाव येथील एका विहिरीत खड्डा खोदून प्रेमसंबंधातून जन्मलेल्या नवजात बालकास कपड्यात गुंडाळून प्लास्टिक पिशवीत घालून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पुरले होते. सदर नवजात बालकास ठार मारून पुरावा नष्ट करणाऱ्या क्रूर आई बापासह तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानवतेला काळिमा फासणार्‍या या घटनेमुळे जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

यांनी केला हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा

हरिश्चंद्र राजेंद्र जाधव या तरूणाच्या आत्महत्येचा तपास करताना नवजात बालकाच्या हत्याकांडाचा उलगडा करण्याची यशस्वी कामगिरी खर्डा पोलिसांनी बजावली आहे. खर्डा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी अत्यंत चातुर्याने तपासाची चक्रे फिरवत सदर गुन्हा उघडकीस आणला. सदर गुन्ह्याची उकल करणाऱ्या टीममध्ये पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल शशी म्हस्के, बाळू खाडे, अशोक बडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अयोध्या पोकळे व अनुराधा घोगरे या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.खर्डा पोलिसांनी बजावलेल्या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक होत आहे.