जामखेड तालुक्यातील पिंपरखेड – हसनाबाद गावातील विविध समस्यांच्या सोडवणुकीसंदर्भात आक्रमक झालेल्या युवा नेत्या पूजा राहुल पवार व रेखा संजय ढोले यांनी आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे गावातील विविध समस्यांचा पाढा वाचला. (Read in front of Sunandatai about the problems in Pimparkhed-Hasnabad)
सुनंदाताई पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या
पिंपरखेड हसनाबाद गावांमधील व शेजारील वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याची समस्या 2) गावातील अंतर्गत रस्ते 3) सांडपाण्याची व्यवस्था. 4) महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र सार्वजनिक सौचालय 5) गावामधील विधवा महिलांचे डोल चालू करणे 6) गावामधील सर्व दिव्यांग बांधवांची एकत्रित पद्धतीने ग्रामपंचायत मार्फत नोंदणी करून प्रमाणपत्र उपलब्ध करून, सर्व कागदपत्र एकत्र करून,ठराव तयार करून त्यांना शासकीय अनुदान मिळवून देणे व समाज कल्याण विभागामार्फत मिळणाऱ्या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणे 7) गावांमधील बांधकाम कामगार, वीटभट्टी कामगार, लोहारकाम करणारे कामगार, सुतारकाम करणारे कामगार, ड्रायव्हर,मजूर इत्यादी असंघटित कामगारांचे एकत्रित नाव नोंदणी करून बांधकाम विभागामार्फत त्यांना 29 प्रकारच्या योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.8. दहा बचत गटांचा मिळून एक जीवन ज्योती ग्रामसंघ तयार झालेला असून त्या ग्राम संघाला ग्रामपंचायतीकडून ऑफिस मिळवून देणे यासंदर्भात प्रयत्न करणे. या मागण्या करण्यात आल्या आहेत.