- Advertisement -

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे (Good news for farmers: Rain in the next five days in the state )

राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला रेड अ‌लर्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सूनची प्रगती समाधानकारक नाही. बळीराजा चिंतेत आहे. राज्यातला काही भाग अजुनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तर काही भाग दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं आज दिलासादायक हवामान अंदाज जाहिर केला आहे. (IMD Mumbai issue weather and monsoon alert for next five days in state) त्यानुसार राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे असणार आहेत अशी माहिती हवामानतज्ज्ञ के. एस.होसाळीकर यांनी ट्विट करुन दिली आहे. (Good news for farmers: Rain in the next five days in the state )

हवामान विभागाच्या मुंबई विभागाने राज्यातील पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहिर करताना राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अ‌लर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे.भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.(Good news for farmers: Rain in the next five days in the state )

११ जुलैचा हवामान अंदाज

भारतीय हवामान विभागानं रविवार ११ जुलैचा अ‌ॅलर्ट जारी करताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, पुणे सातारा, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी येलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे.(Good news for farmers: Rain in the next five days in the state )

१२ जुलैचा हवामान अंदाज

भारतीय हवामान विभागानं सोमवारी १२ जुलैसाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. तर या दिवशी नाशिक, बुलडाणा, वाशिम, परभणी, हिंगोली,नांदेड आणि लातूरमध्ये पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.(Good news for farmers: Rain in the next five days in the state )

१३ जुलैचा हवामान अंदाज

भारतीय हवामान विभागानं मंगळवारी १३ जुलैसाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. तर या दिवशी परभणी, हिंगोली,नांदेड पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या जिल्ह्यांना येलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.(Good news for farmers: Rain in the next five days in the state )

१४ जुलैचा हवामान अंदाज

भारतीय हवामान विभागानं बुधवारी  १४ जुलैसाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. तर जालना परभणी, हिंगोली,नांदेड आणि लातूरमध्ये पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.