agriculture department | रब्बी हंगाम गहु, हरभरा,ज्वारी बियाणे अनुदान 2021

जामखेड कृषी विभागाकडून ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे अवाहन !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्याच्या कृषी विभागाने रब्बी हंगामाची (Rabbi season) तयारी हाती घेतली आहे.रब्बी हंगामातील पिकांच्या बियाण्यांवर 50% अनुदान उपलब्ध करून देण्याची योजना कृषी विभागाने (agriculture department) सुरू केली आहे. हे अनुदान राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत (National Food Security Campaign) दिले जाणार आहे. या योजनेत जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जामखेड कृषी विभागाने केले आहे. (Appeal of Jamkhed Agriculture Department)

रब्बी हंगामातील पीक प्रात्यक्षिकासाठी (Rabbi season crop demonstration) एका शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत बियाणे, जैविक खते, सुक्ष्ममूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी एका पिकाच्या प्रकारानुसार  प्रती एकर मर्यादेत DBT तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. पीक प्रात्यक्षिकासाठी एका गावातून 25 शेतकऱ्यांनी अर्ज करणे बंधनकारक आहे. ऑनलाईन लाॅटरी पध्दतीने शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. (agriculture department)

रब्बी हंगामासाठी अनुदानावर दिल्या जाणाऱ्या बियाणांसाठी कृषी विभागाकडून (agriculture department) ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवले जाणार आहेत. 30 ऑगस्ट 2021 पासुन ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 10 सप्टेंबर 2021 ही आहे. या योजनेतून शेतकर्‍यांना 50% अनुदानावर महाबीजचे बियाणे (Mahabeej seeds) उपलब्ध होणार आहेत.सदर बियाणे अनुदान योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरता येईल.

जामखेड तालुका कृषी (agriculture department) कार्यालयाने जामखेड तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून रबी हंगाम 2021 मध्ये गहू, हरभरा आणि ज्वारी पेरू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना महाबीज बियाणे 50% अनुदानावर उपलब्ध होईल. The Jamkhed Taluka Agriculture Officer’s Office has appealed to the maximum number of farmers in Jamkhed taluka to apply online so that Mahabeej seeds will be available on 50% subsidy for the farmers who want to sow wheat, gram and sorghum in Rabi season 2021.