maharashtra breaking news | ईडीची पिडा : मंत्री अनिल परब समन्स प्रकरण तापले !

राजकीय वर्तुळातून येऊ लागल्या तिखट प्रतिक्रिया : वाचा कोण काय म्हणाले ?

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : maharashtra breaking news |  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे (Union Minister Narayan Rane vs Chief Minister Uddhav Thackeray) त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती.याच अटक प्रकरणात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (State Transport Minister Anil Parab) आणि पोलीस अधिकाऱ्यामध्ये संभाषण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. भाजपने परब यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. राणे विरूध्द शिवसेना (Rane vs Shiv Sena) हा संघर्ष  चिघळत चालला आहे. याचा दुसरा अंक रविवारी समोर आला. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मागे ईडीची पिडा लागली आहे. (ED sent summons to Transport Minister Anil Parab)

maharashtra breaking news | शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांना ईडीने रविवारी नोटीस धाडत मंगळवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे फर्मान धाडल्याची बातमी समोर येताच राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. शह काटशहच्या या अनोख्या राजकारणाने भाजप विरूध्द शिवसेना हा संघर्ष अधिक तीव्र बनल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.  परब यांना ईडीने नोटीस धाडताच राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. (As soon as Minister Anil Parab was issued a notice by the ED, various reactions are now taking place in the political circles.)

हिंमत असेल तर ईडीच्या कार्यालयात जा – नितेश राणे

अनिल परब यांना ईडीने नोटीस धाडताच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. नितेश राणे म्हणतात हिंमत असेल तर ईडीच्या कार्यालयात जा. आपली बाजू मांडा. स्वच्छ असेल तर ईडी कारवाई करणार नाही. घाबरण्याचं कारण नाही, अनिल परब यांच्या पापाचा घडा भरलाच होता. त्यांचा परिवहन खात्यातील भ्रष्टाचार उघड होता. त्यामुळे ईडीकडून त्यांना काही प्रेमपत्रं येणार नव्हतं ना. नोटीसच मिळणार होती. आता पळपुटेपणा करू नये. ईडीच्यासमोर जाऊन स्वत:ला निर्दोष असल्याचं सिद्ध करावं, असं राणे यांनी म्हटलं आहे. (maharashtra breaking news)

भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरी होता, आप क्रोनोलाॅजी समज लिजीये  – खासदार संजय राऊत

तर दुसरीकडे शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांचीही अनिल परब ईडी नोटीस प्रकरणावर प्रतिक्रिया आली आहे. खासदार राऊत म्हणतात,शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले आहे. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता असं म्हणत राऊत यांनी राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच, अनिल परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र असे म्हणत राऊत यांनी राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.(maharashtra breaking news)

कायदेशीर लढा देणार  – मंत्री अनिल परब

ईडीने नोटीस बजावल्यानंतर अनिल परब (Minister Anil Parab) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पल्याला आज संध्याकाळी ईडीची नोटीस मिळाली आहे. पण नोटीस नेमकी कशासाठी हे वकील समिती समवेत चर्चा करून उत्तर देई. पण हे सूडबुद्धीने केले का यावर मला आता बोलायचे नाही, मला नोटीस आली त्याला उत्तर देईल. नोटीस बघून त्याला कायदेशीर उत्तर देण्यात येईल असं सांगत परब यांनी कायदेशीर लढा देणार असल्याचं स्पष्ट केलं. (maharashtra breaking news)

कुणाच्या आईला, कुणाच्या बायकोला पोलीस स्टेशनला बोलविल्या जातं. ही कुठली संस्कृती आहे ? -सुप्रिया सुळे

अनिल परब प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (NCP leader Supriya Sule) यांनी देखील वर्धा येथे माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, “आमच्या जेष्ठ नेत्यांना, सगळ्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे, असं मी कधीच पाहिलं नाही.कुणाच्या आईला, कुणाच्या बायकोला पोलीस स्टेशनला बोलविल्या जातं. ही कुठली संस्कृती आहे? ते काय विचार करतात हे मी नाही सांगू शकत, पण हे सुसंस्कृत महाराष्ट्र किंवा भारतीय संस्कृतीत कधी असं पाहिलं नाही, हे दुर्दैवी आहे.” असं त्या म्हणाल्या आहेत. (maharashtra breaking news)

अनिल परब हाजीर हो – ईडीने धाडले समन्स

maharashtra breaking news | राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना मनी लाउंडरिंग प्रकरणी ईडीने समन्स पाठवले आहे. (ED summons Anil Parab) ईडीने अनिल परब यांना मंगळवारी ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता मुंबईच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (The ED has ordered Minister Anil Parab to be present at the Mumbai office on Tuesday, August 31 at 11 am. )