National Yogasana Competition | राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी अनुराधा व चैतन्य या दोघा राऊत भावंडाची निवड

National Yogasana Competition | जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील अनुराधा पंकज राऊत व चैतन्य पंकज राऊत या दोघा भावडांची राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.अनुराधा व चैतन्य या दोघा बहिण भावंडानी पुन्हा एकदा चापडगावचे नाव राज्यपातळीवर झळकवले आहे. दोघांच्या निवडीमुळे चापडगावकरांनी आनंदोत्सव साजरा केला. ( Anuradha and Chaitanya are the two Raut brothers selected for the National Yogasana Competition )

अहमदनगर- सोलापूर महामार्ग वसलेलं चापडगाव हे कर्जत तालुक्यातील महत्वाचे गाव आहे. चापडगाव येथील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेने चापडगावचे नाव कायम राज्यात चर्चेत असतं. मागच्याच आठवड्यात येथील विद्यार्थीनी ऐश्वर्या शिंदे हिने एक विक्रम प्रस्थापित केला. एकाच वेळी ऐश्वर्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दोन परिक्षा उत्तीर्ण होत चापडगावचे नाव राज्यात झळकवले होते.

Anuradha and Chaitanya are the two Raut brothers selected for the National Yogasana Competition

चापडगावच्या अनुराधा व चैतन्य या राऊत भावंडानी राज्यस्तरीय योग स्पर्धेत दमदार कामगिरी करत चापडगावचे नाव राज्यात झळकावले आहे.

Anuradha and Chaitanya are the two Raut brothers selected for the National Yogasana Competition

चापडगावच्या अनुराधा पंकज राऊत हिने नुकताच राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत भाग घेतला होता. १४ ते १६ वर्षे वयोगटात अनुराधाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यानुसार तिची राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Anuradha and Chaitanya are the two Raut brothers selected for the National Yogasana Competition

तसेच तिचाच लहान भाऊ चैतन्य पंकज राऊत यानेही १० ते १२ वर्षे वयोगटासाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावून चापडगावची मान राज्यपातळीवर उंचावली आहे.

Anuradha and Chaitanya are the two Raut brothers selected for the National Yogasana Competition

योगा या व्यायाम प्रकारामध्ये प्राविण्य मिळविणे सोपी गोष्ट नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत, आहार, सातत्यपूर्ण कसरत गरजेची असते. सध्याच्या काळात योगाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे योगाची स्पर्धाही वाढत आहे. अशातच चापडगावच्या या भावंडांनी योगा स्पर्धेत राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत मारलेली मजल कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे अशी प्रतिक्रिया कायदेतज्ज्ञ ॲड विकास शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Anuradha and Chaitanya are the two Raut brothers selected for the National Yogasana Competition

Anuradha and Chaitanya are the two Raut brothers selected for the National Yogasana Competition

Anuradha and Chaitanya are the two Raut brothers selected for the National Yogasana Competition

Anuradha and Chaitanya are the two Raut brothers selected for the National Yogasana Competition

Anuradha and Chaitanya are the two Raut brothers selected for the National Yogasana Competition

Anuradha and Chaitanya are the two Raut brothers selected for the National Yogasana Competition

web titel : Anuradha and Chaitanya are the two Raut brothers selected for the National Yogasana Competition