Karjat Jamkhed News: राष्ट्रवादीला भगदाड : दिघोळ सोसायटीच्या चेअरमनसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : दिघोळ- माळेवाडीमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. दिघोळ सोसायटीचे चेअरमन सह राष्ट्रवादीच्या युवा नेत्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. दिघोळमध्ये झालेल्या या राजकीय भूकंपामुळे राष्ट्रवादी अर्थात रोहित पवार गटाला मोठे भगदाड पडले आहे.

Karjat Jamkhed News, Dighol society chairman and hundreds of activists join BJP, ram shinde latest news today

रोहित पवारांच्या मनमानी व हुकुमशाही कारभाराविरोधात मतदारसंघातील गावागावात मोठ्या प्रमाणात बंड होऊ लागले आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या शाश्वत विकासावर प्रेरित होऊन आणि कर्जत-जामखेडच्या स्वाभिमान आणि अभिमानासाठी भूमिपुत्रांनी हाती घेतलेल्या निर्णायक लढ्यास बळ देण्यासाठी दिघोळ – माळेवाडी गावातील राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे आमदार प्रा राम शिंदे यांची राजकीय ताकद वाढली आहे.

Karjat Jamkhed News, Dighol society chairman and hundreds of activists join BJP, ram shinde latest news today

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांच्या विजयासाठी ज्यांनी ज्यांनी जीवाचं रान केलं होतं, त्या सर्वांनी रोहित पवारांविरोधात एल्गार पुकारत आमदार प्रा. राम शिंदे यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. रोहित पवारांची साथ सोडत या सर्वांनी भाजपात प्रवेश करण्याचा धडाका लावला आहे.

Karjat Jamkhed News, Dighol society chairman and hundreds of activists join BJP, ram shinde latest news today

दिघोळ सोसायटीचे चेअरमन मच्छिंद्र तागड, माळेवाडी दुध डेअरीचे चेअरमन बाबूराव आवारे, राष्ट्रवादीचे नेते हनूमान तागड, राष्ट्रवादीचे युवा नेते नारायण कोचाळे, सोमनाथ दगडे, माजी ग्रामपंचायत सदस्य गहिननाथ विटकर, जेष्ठ नेते आश्रूबा कोचाळे तसेच त्यांचे सहकारी सचिन विधाते,अशोक गवळी, सागर विधाते, बाळू रहित, विठ्ठल विधाते, बापूराव गवळी, बापूराव शिंदे, मिठुलाल राऊळ, धनंजय राऊत, भरत आवारे,धनंजय राऊत, नामदेव आवारे,अशोक आवारे, बळीराम विधाते, आश्रू शेंडकर, बंडू मच्छिंद्र, आप्पा शेंडकर, रामकिसन विधाते, अंकुश विधाते, शहाजी राऊत ,मंगेश राऊत, दत्तात्रय विधाते, गोपीनाथ विधाते या प्रभावशाली व जनाधार असलेल्या महत्वाच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला.हा पक्षप्रवेश सोहळा चोंडी येथे पार पडला.

Karjat Jamkhed News, Dighol society chairman and hundreds of activists join BJP, ram shinde latest news today

यावेळी पंचायत समिती माजी सदस्य मनोज राजगुरू, तंटामुक्ती अध्यक्ष धीरजशेठ रसाळ, उपसरपंच दशरथ राजगुरू, ग्रामपंचायत सदस्यसुनिल रंधवे, माजी सरपंच गहिननाथ गिते, शिवसेना शिंदे गट तालुका उपप्रमुख वसंत रसाळ, बुथ प्रमुख परमेश्वर विटकर दिघोळ, दिघोळ सोसायटीचे माजी चेअरमन मच्छिंद्र गिते, भाजपा युवा नेते राहुल टाके, बिभीषण पारखे, संतोष माने, शरद तागड, हनूमान खुणे, बापूराव दगडे, सुशेन बनसोडे, सुमित लोखंडे सह आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Karjat Jamkhed News, Dighol society chairman and hundreds of activists join BJP, ram shinde latest news today

कर्जत-जामखेड मतदारसंघात यंदा धनशक्ती (पार्सल) विरूध्द जनशक्ती (भूमिपुत्र) अशी थेट लढत आहे. यामुळे सर्वसामान्य गोरगरिब जनतेची मोठी ताकद आमदार राम शिंदे यांच्या पाठीशी एकवटली आहे. आमदार शिंदे यांच्या जनसंवाद पदयात्रेनंतर मतदारसंघाचे चित्र पुर्णता: बदलून गेले आहे.

आमदार राम शिंदे यांनी मतदारसंघात केलेल्या शाश्वत विकासावर प्रेरित होऊन मतदारसंघातील शेकडो युवक व जेष्ठ कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने भाजपात प्रवेश करण्याचा जोरदार धडाका लावला आहे. ‘दबाव, दडपशाही, गुंडशाही, हिटलरशाही, हुकुमशाही, विविध प्रलोभने या सर्वांना झुगारून गावागावात रोहित पवारांविरोधात बंड सुरू झाले आहे. पाच वर्षे केलेली जाहिरातबाजी, इव्हेंटबाजी आणि गंडवागंडवीच्या विरोधात जनतेचा उद्रेक उफाळून आला आहे.’

Karjat Jamkhed News, Dighol society chairman and hundreds of activists join BJP, ram shinde latest news today

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवारांविरोधात मोठी लाट सक्रिय झाली आहे.गावागावातील राष्ट्रवादीचे अनेक नेते व कार्यकर्ते आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश करू लागले आहेत. या सर्व घडामोडी पाहता स्थानिक भूमिपुत्र आमदार राम शिंदे यांची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याचे दिसत आहे. यंदा मतदारसंघामध्ये स्थानिक कार्यकर्ते व गोरगरीब सर्वसामान्य जनता आमदार राम शिंदे यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात एकवटली आहे. यंदाच्या निवडणुकीत आमदार राम शिंदेंचे पारडे जड झाल्याचे दिसून येत आहे. भाजपा विजयाचा गुलाल शंभर टक्के उधळणार असेच चित्र आता निर्माण झाले आहे.

Karjat Jamkhed News, Dighol society chairman and hundreds of activists join BJP, ram shinde latest news today