आमदार प्रा राम शिंदे यांना निवडणूक लढवण्यासाठी युवा नेते उमेश रोडे यांच्याकडून 2 लाख रूपयांची आर्थिक मदत
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवाररूपी धनदांडग्या बलाढ्य अश्या हुकुमशाही धनशक्तीला परतवून लावण्यासाठी गोरगरीब जनता आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठीशी एकवटली आहे. या निवडणुकीत आमदार शिंदे यांना आर्थिक मदत करण्यासाठी स्वाभिमानी कार्यकर्ते सरसावले आहेत. आमदार प्रा राम शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले जवळा येथील युवा नेते उमेश रोडे यांनी आमदार शिंदे यांना निवडणूक लढवण्यासाठी दोन लाख रूपयांची आर्थिक मदत केली आहे.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार प्रा.राम शिंदे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आर्थिक अडचण असल्याचे सांगत जनतेने आर्थिक मदत करावी असे आवाहन केल्यानंतर जवळा ग्रामपंचायतचे माजी सदस्य तथा युवा नेते उमेश रोडे यांनी आमदार राम शिंदे यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी २ लाख रूपयांची आर्थिक मदत केली.यंदाची विधानसभा निवडणूक गोरगरिब जनतेने व स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी हातात घेतल्याचे दिसू लागले आहे.
यंदा होत असलेल्या कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील सर्वसामान्य गोरगरिब जनता आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठीशी मोठ्या ताकदीने एकवटली आहे.आमदार राम शिंदेंना विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी सर्वसामान्य गोरगरिब जनता वर्गणी गोळा करून आर्थिक मदत करताना दिसत आहेत. यामध्ये भाजपाचे युवा नेते उमेश रोडे या सर्वसामान्य कुटूंबातील तरूण कार्यकर्त्याने निवडणूकीसाठी आर्थिक मदत करत आपला खारीचा वाटा उचलला आहे.