जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। वेळ – सकाळी दहाची.. वार – रविवारचा.. ठिकाण राजुरीची प्राथमिक शाळा.. नागरिकांचे जथ्थेच्या जथ्थे शाळेच्या आवारात दाखल होत होते.. महिला.. तरूण.. जेष्ठ नागरिक आणि सामान्य माणसं यात होती.. निमित्त होतं.. जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार वैशालीताई सुभाष काळदाते आणि त्यांच्या सहकारी उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाचं..गावपातळीवरच्या राजकारणात इतकी उत्स्फूर्त गर्दी कधीच पाहण्यात आली नव्हती.. परंतू राजुरीतील जनतेने याला छेद देत जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या पाठीशी दाखवलेली विशाल ताकद निर्णायक संदेश देणारी ठरली.. जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराच्या पहिल्या रॅलीने गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. यामुळे रविवारचा दिवस गाजवला तो जनसेवा ग्रामविकास पॅनलने.
जामखेड तालुक्यातील राजुरी ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे संपूर्ण जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत दोन पॅनलमध्ये चुरशीचा सामना रंगला आहे. राजुरी गावचे लोकप्रिय नेते माजी सरपंच सुभाष तात्या काळदाते यांनी जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या माध्यमांतून 10 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहेत. रविवारी या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ झाला.
रविवारी जनसेवा ग्रामविकास पॅनलने गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करत विरोधकांची हवा गुल केली. सुभाष तात्या काळदाते यांच्या पॅनलला जनतेचा उत्स्फूर्त असा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे रविवारच्या रॅलीतून पुन्हा अधोरेखित झाले. जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या प्रचार रॅलीला झालेली गर्दी पाहून विरोधकांच्या बत्त्या गुल झाल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
जनसेवा ग्रामविकास पॅनलने रविवारी प्रचाराचे रणशिंग फुंकले. या पॅनलने रॅलीद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यातून या पॅनलने प्रचारात आघाडी घेतली आहे. या रॅलीत राजुरी, डोळेवाडी, घुलेवस्ती, एकबुर्जी, बांगरमळा येथील 1500 पेक्षा अधिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.या रॅलीला महिला पुरुष आणि तरूणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जनसेवा ग्रामविकास पॅनलची रॅली पाहून राजुरीत जनसेवा ग्रामविकास पॅनलचे तुफान आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दरम्यान, जनसेवा ग्रामविकास पॅनलची रॅली रविवारी सकाळी दहा वाजता प्राथमिक शाळेतून सुरू झाली होती. त्यानंतर ही रॅली रेणुका माता मंदिरात गेली. तेथे पॅनल प्रमुख आणि सर्व उमेदवारांनी प्रचाराचा नारळ वाढत देवीचा आशिर्वाद घेतला. त्यानंतर ही रॅली संपूर्ण गावात गेली.
या रॅलीचा शेवट राम मंदिर परिसरात झाला. श्री राम मंदिरात सर्व उमेदवारांनी प्रभू श्रीरामाचा आशिर्वाद घेतला. त्यानंतर जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या सर्व नेत्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ न भुतो न भविष्येती असाच झाला. नागरिकांनी दर्शवलेली अलोट अशी उपस्थिती, गर्दीचे आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडणारी ठरली.
दरम्यान राजुरीतील जनता माजी सरपंच सुभाष तात्या काळदाते यांच्या पाठीशी एकवटल्याचे रविवारी दिसून आले. जनसेवा ग्रामविकास पॅनलने केलेल्या जंगी शक्तीप्रदर्शनामुळे विरोधी गोटात चिंतेचे वातावरण पसरले नसेल तर नवलच, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.