जामखेड : चोंडी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी वच्छला भांडवलकर व व्हा चेअरमनपदी बाबुराव शिंदे यांची बिनविरोध निवड

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांच्या चोंडी गावच्या विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी वच्छला सुभाष भांडवलकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी बाबुराव शिंदे यांची आज ६ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. या संस्थेवर प्रा राम शिंदे यांची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे.

Jamkhed, Vachlala Bhadwalkar elected as Chairman of Chondi Seva Society and Baburao Shinde elected as Chairman of vice unopposed

चोंडी व आघी या दोन गावांसाठी एक असलेल्या विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या तत्कालीन चेअरमन, व्हाईस चेअरमन व एका संचालकावर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे शासनाने कारवाई केली होती.तिघांचे संचालकपद रद्द करण्यात आले होते. तेव्हापासून चोंडी सेवा संस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपद रिक्त होते. संस्थेतील ९ संचालकांनी विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येत प्रा शिंदे सुचवतील तो चेअरमन व व्हाईस असे धोरण ठरवले होते.

Jamkhed, Vachlala Bhadwalkar elected as Chairman of Chondi Seva Society and Baburao Shinde elected as Chairman of vice unopposed

आज ६ रोजी चोंडी सेवा संस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवड प्रक्रिया पार पडली. प्रा राम शिंदे यांनी ही निवड प्रक्रिया सुरु होण्याच्या दहा मिनिटे आधी चेअरमनपदासाठी वच्छला सुभाष भांडवलकर व व्हाईस चेअरमनपदासाठी बाबुराव शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर या दोन्ही संचालकांची चेअरमन व व्हाईस चेअरमन म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

Jamkhed, Vachlala Bhadwalkar elected as Chairman of Chondi Seva Society and Baburao Shinde elected as Chairman of vice unopposed

यावेळी जेष्ठ संचालक अशोक देवकर, पुष्पावती वसंत देवकर, भाऊसाहेब उदमले, अनिल शिंदे, अशोक भगत, महंमद शेख, संदिप शेळके हे सोसायटी संचालक व भाजपा नेते पांडुरंग उबाळे, भाजपा नेते डाॅ बाळासाहेब बोराटे उद्योजक विशाल शिंदे, युवा नेते विशाल भांडवलकर, युवा नेते मिलिंद देवकर, युवा नेते दिनेश शिंदे, आलेश शिंदे, तुकाराम उदमले सर, अक्षय उबाळे, सतीश लांबाटे, तुकाराम रमेश शिंदे, दत्ता शिंदे, आनंद शिंदे, सादिक शेख, संतोष कोरडे, अजिंक्य शिंदे, विशाल गौतम शिंदे, आनंद शिंदे, राजेंद्र टकले, सह आदी चोंडी ग्रामस्थ उपस्थित होते.

Jamkhed, Vachlala Bhadwalkar elected as Chairman of Chondi Seva Society and Baburao Shinde elected as Chairman of vice unopposed

निवडीनंतर विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांच्या कार्यालयात भाजपाचे जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, शहर तालुकाध्यक्ष संजय काशिद यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बाजार समितीचे सभापती शरद कार्ले,उपसभापती नंदकुमार गोरे, माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर, संचालक डाॅ गणेश जगताप, संचालक नारायण जायभाय,पवनराजे राळेभात, मनोज कुलकर्णी, लहू शिंदे, शिवाजीराव भांड, जालिंदर चव्हाण, गौतम कोल्हे, उध्दव हुलगुंडे, पोपट जमदाडे, उपसरपंच आबा ढवळे, राम पवार, राहुल चोरगे सह आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.