जामखेड : हळगाव कृषि महाविद्यालयासाठी कायमस्वरूपी पाणी योजना मंजूर करा, संभाजी ब्रिगेडची कृषिमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयासाठी शासनाने कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना मंजुर करावी,अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्याचे कृषि मंत्री व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले.

Jamkhed , Sanction permanent water scheme for Halgaon Agriculture College, Sambhaji Brigade demands through statement to Agriculture Minister, jamkhed latest news today,

जामखेड तालुक्यातील हळगाव कृषि महाविद्यालयाच्या माध्यमांतून तालुक्यातील शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोग पाहण्याची व ते प्रयोग आपल्या शेतात राबवण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. यासाठी कृषि महाविद्यालयाला शाश्वत पाण्याची आवश्यकता आहे. यासाठी सरकारने कृषि महाविद्यालयासाठी स्वतंत्र पाणी योजना मंजुर करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परिसरातील शेती, पीक पद्धती, हवामान, पर्जन्यमान यांचा अभ्यास व संशोधन करून शेती व शेतकऱ्याच्या समस्या शोधून त्यावर कृषी वैज्ञानिक उपाययोजना शोधणे आवश्यक आहे. याचा शेतकऱ्यांना लाभ झाला पाहिजे.

यासाठी हळगाव कृषि महाविद्यालयाची १०० एकर शेती कायमस्वरूपी शेतीविषयक संशोधन व प्रयोगासाठी उपयोगात आणण्यासाठी कायमस्वरूपी पाण्याची आवश्यकता आहे.

यासाठी सरकारने तातडीने हळगाव कृषि महाविद्यालयासाठी पाणी योजना मंजुर करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत व तालुका अध्यक्ष राजेंद्र काटकर यांच्या सह्या आहेत.