जामखेड ब्रेकिंग : खर्डा ग्रामपंचायतीवर भाजपचा कब्जा, खर्डा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी संजीवनीताई पाटील यांची वर्णी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । कर्जत – जामखेड मतदारसंघाचे लक्ष लागून असलेल्या खर्डा ग्रामपंचायतीवर आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीने कब्जा मिळवला.

Jamkhed breaking, BJP occupation of Kharda Gram Panchayat, Sanjivanitai Patil appointed   Kharda gram panchayat Sarpanch

जामखेड कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील यांच्या पत्नी संजीवनीताई पाटील यांची सरपंचपदी वर्णी लागली. पाटील यांची सरपंचपदी वर्णी लागताच भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला.

Jamkhed breaking, BJP occupation of Kharda Gram Panchayat, Sanjivanitai Patil appointed   Kharda gram panchayat Sarpanch

17 सदस्य असलेल्या खर्डा ग्रामपंचायतच्या अडीच वर्षापुर्वी पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत 10 जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायतीवर कब्जा मिळवला होता. या निवडणुकीत भाजपचा 7 जागांवर विजय झाला होता. खर्डा ग्रामपंचायतवर सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादीत दोन आणि तीन वर्षाचा पद वाटपाचा फाॅर्म्यूला ठरला होता. दोन वर्षे झाल्यानंतर सरपंच नमिता गोपाळघरे आणि उपसरपंच रंजना लोखंडे यांनी राजीनामा दिला होता. नव्या सरपंच आणि उपसरपंच निवडीसाठी राष्ट्रवादीत हालचाली सुरु झाल्या होत्या.परंतू या निवडीत भाजपा नेते रविंद्र सुरवसे यांनी एन्ट्री करत सरपंच भाजपचाच होणार अशी घोषणा केली होती. या निवडीत भाजप ॲक्टिव्ह होताच राष्ट्रवादी सतर्क झाली होती.

ग्रामपंचायत सदस्य फोडाफोडीला सुरुवात झाली होती. भाजपने राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना आपल्या कळपात ओढत राष्ट्रवादीला धक्का दिला होता, परंतु राष्ट्रवादीने भाजपचा एक सदस्य आपल्या गळाला लावत जोरदार प्रत्यत्तर दिले होते. त्यानंतर 8 सदस्या घेऊन भाजप तर 9 सदस्यांना घेऊन राष्ट्रवादी सहलीवर रवाना झाली होती. परंतू सरपंच पदाच्या प्रत्यक्ष निवडणूक भाजपने राजकीय चमत्कार घडवत राष्ट्रवादीचा एक सदस्य फोडला. फुटलेल्या त्या सदस्याने गुप्त मतदानात भाजपच्या उमेदवाराला मतदान केले.भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवार संजीवनी वैजीनाथ पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार रोहिणी प्रकाश गोलेकर यांचा एका मताने पराभव केला. राष्ट्रवादीकडे सत्तास्थापनेचे संख्याबळ असतानाही राष्ट्रवादीला धक्कादायक पराभव झाला. खर्ड्याच्या लढाईत भाजपकडून राष्ट्रवादीचा गड उध्वस्त झाला आहे. यामुळे भाजपचा बालेकिल्ला ही खर्ड्याची ओळख पुन्हा प्रस्थापित झाली आहे.

खर्डा ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार संजीवनीताई वैजीनाथ पाटील यांच्या विजयाची घोषणा होताच भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी खर्डा शहरात फटाक्यांची आतिषबाजी अन् गुलालाची उधळण करत जोरदार विजयी जल्लोष केला. या विजयी जल्लोषात जामखेड तालुका भाजपचे बहुतांश नेते सहभागी झाले होते. यामध्ये या विजयाचे शिल्पकार रविंद्र सुरवसे,भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, जामखेड बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील, नंदकुमार गोरे, तालुका सरचिटणीस लहू शिंदे, बाजीराव गोपाळघरे, नानासाहेब गोपाळघरे,बाळासाहेब गोपाळघरे, बिभीषण धनवडे, माजी सरपंच संजय गोपाळघरे, नितीन सुरवसे, आप्पासाहेब ढगे सह आदी नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.