जवळ्यात नय्यूम शेख तर नायगावात सुवर्णा उगलेंनी मारली बाजी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । नायगाव आणि जवळा ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचे निकाल (Jamkhed taluka gram panchayat by-election results) आज बुधवारी सकाळी 11 वाजता हाती आले असून जवळ्यात नय्यूम शेख तर नायगावमध्ये सुवर्णा उगले यांनी बाजी मारली.

जामखेड तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ५ मधील सर्वसाधारण जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत किरण हजारे विरूध्द नय्यूम शेख असा थेट सामना झाला होता. या निवडणुकीत एकुण 774 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये नय्यूम अस्लम शेख या उमेदवाराने 439 घेऊन विजयश्री खेचून आणली. पराभूत उमेदवार किरण शिवराम हजारे यांना 329 मते मिळाली. या निवडणुकीत हजारे यांचा 110 मतांनी पराभव झाला.

नय्यूम शेखचा राजकारणात दिमाखात प्रवेश

जवळा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. नय्यूम शेख विरूध्द किरण हजारे या अतिशय अतितटीच्या आणि चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार ? याबाबत कालपासून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र आज सकाळी समोर आलेल्या निकालात नय्यूम शेख यांनी किरण हजारेंना पराभवाची धूळ चारत गावगाड्याच्या राजकारणात दिमाखात प्रवेश केला.

जवळ्यात नोटाने खाते खोलले

दरम्यान या निवडणुकीत नोटा या पर्यायाला 04 मते मिळाली. नोटाला मतदान करणारे ते चौघे कोण ? याचीच चर्चा जवळ्यात सुरू आहे.

चौरंगी लढतीत सुवर्णा उगलेंची बाजी

तर दुसरीकडे नायगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या निकालाकडेही तालुक्याचे लक्ष लागले होते.प्रभाग क्रमांक 01 मधील सर्वसाधारण जागेसाठी 04 उमेदवारांमध्ये सामना झाला होता. नायगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत एकुण 85.88 टक्के मतदान झाले होते. आज समोर आलेल्या निवडणुक निकालात सुवर्णा चंद्रकांत उगले यांनी 229 मते घेत मोठा विजय संपादन केला.

नायगावात चौरंगी लढत झाली होती. सुवर्णा उगले यांनी आण्णासाहेब भानुदास शिंदे (130 मते), सिंधूबाई विठ्ठल शिंदे (73 मते ) सुखदेव जनार्दन शिंदे ( शुन्य मते) या तिघांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

उमेदवाराला स्वता:चेच मत मिळाले नाही

नायगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सुखदेव जनार्दन शिंदे या उमेदवाराला शुन्य मते मिळाली. या उमेदवाराला स्वता:चे सुध्दा मत न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सावरगाव आणि आघी बिनविरोध

सावरगाव ग्रामपंचायतमधील प्रभाग १ मधील अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी होणाऱ्या निवडणूकीसाठी योगेश दत्तात्रय वाघमारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. तर आघी येथील प्रभाग ३ मधील अनुसूचित जाती स्त्री या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी साधना कल्याण शिंदे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळ आघी व सावरगाव येथील निवडणुका यापुर्वीच बिनविरोध झाल्या आहेत.

जवळा पोटनिवडणूक निकाल

1.किरण शिवराम हजारे -329
2. नयूम अस्लम शेख -439
3. NOTA -4
विजयी – नयूम अस्लम शेख

नायगाव पोटनिवडणूक निकाल

1.अण्णासाहेब भानुदास शिंदे – 130
2.उगले सुवर्णा चंद्रकांत -229
3.सिंधुबाई विठ्ठल शिंदे- 73
4.सुखदेव जगन्नाथ शिंदे -0
5 NOTA -0
विजयी – सुवर्णा चंद्रकांत उगले