जामखेड : आमदार राम शिंदे गटाची विजयी घौडदौड सुरू, शिऊरला दोन जागांवर भाजपने उघडले खाते !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा सुरू आहे. या निवडणुका स्थानिक आघाड्या करून लढवल्या जात असल्या तरी राजकीय पक्षांच्या गावपातळीवर नेतृत्वासाठी ही निवडणुक महत्वाची असते, म्हणून पक्षीय पातळीवर ग्रामपंचायत निवडणुकांना मोठे महत्व प्राप्त झाले आहे. राज्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोणता पक्ष बाजी मारणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असतानाच जामखेड तालुक्यात भाजपा आमदार प्रा राम शिंदे गटाने दोन जागांवर खाते उघडून निवडणुकीत आघाडी घेतली आहे.

Gram Panchayat Election 2022, MLA Ram Shinde's winning streak continues, two BJP seats uncontested in Shiur

जामखेड तालुक्यातील रत्नापुर, शिऊर आणि राजुरी या राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाच्या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आमदार राम शिंदे आणि भारतीय जनता पार्टीसाठी आनंदाची बातमी समोर आली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकाला आधीच भाजपने जामखेड तालुक्यात जागांवर खाते खोलले आहे.यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या गोटात सामसूम पसरली आहे.

जामखेड तालुक्याच्या राजकारणात महत्वपूर्ण असलेल्या शिऊर ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार प्रा राम शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले जामखेड बाजार समितीचे सभापती गौत्तम (आण्णा) उत्तेकर यांनी आपला राजकीय करिष्मा दाखवत शिऊर ग्रामपंचायत निवडणुकीत दोन जागा बिनविरोध काढण्यात यश मिळवले. यामुळे भाजपने ग्रामपंचायत निवडणुक निकालाआधीच जामखेड तालुक्यात विजयी घौडदौड सुरू केली आहे.

शिऊर ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी शितल इंगोले आणि शोभा पिंपरे या दोन महिला उमेदवारांच्या विरोधातील उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे या दोन्ही महिला उमेदवार बिनविरोध झाल्या आहेत. भाजपने शिऊरमध्ये दोन जागांवर जोरदार खाते उघडले आहे. आमदार राम शिंदे यांची जादूची कांडी फिरू लागल्याचे संकेत आता यानिमित्ताने दिसू लागले आहे.

शिऊर ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध झालेल्या महिला उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचा भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड अजय (दादा) काशिद, प्रभारी महारूद्र महारनवर, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात यांच्या हस्ते जामखेडमध्ये सत्कार करण्यात आला.

यावेळी बाप्पुसाहेब माने, विठ्ठल चव्हाण, पाटोदा सेवा सोसायटीचे चेअरमन अशोक महारनवर, आप्पासाहेब ढगे, डाॅ नानासाहेब देवकाते, गणेश डोंगरे, तात्या काळे पाटील, संदिप जायभाय, विनोद चव्हाण, राजू शिंगणे, दत्ता गिरी, भाऊ पिंपरे, गणेश निकम, दादासाहेब निकम, भाऊसाहेब तनपुरे, आजिनाथ निकम, आजिनाथ समुद्र, संदिप जायभाय, आप्पासाहेब निकम, उत्तम तनपुरे, आण्णासाहेब निकम सह आदी मान्यवर आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.