उपसभापती अंकुशराव ढवळे यांना मातृशोक !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुशराव ढवळे यांच्या मातोश्री शांताबाई विठ्ठल ढवळे यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. बाजारपेठ समितीचे संचालक करण ढवळे यांच्या त्या आजी होत. त्यांच्या मागे मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील त्यांच्या शेतात आज (शनिवारी) सायंकाळी 07:30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शांताबाई ढवळे यांच्या निधनामुळे ढवळे कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.