Rohit Pawar met BJP ministers in Delhi | रोहित पवारांनी घेतल्या भाजपच्या मंत्र्यांच्या दिल्लीत गाठीभेटी; राजकीय वर्तुळात चर्चांना आले उधाण
कर्जत जामखेडच्या विकास कामांसाठी गाठीभेटी घेतल्याचे स्पष्ट
जामखेड टाईम्स वृत्तसेवा | सत्तार शेख | राष्ट्रवादीचे युवा नेते तथा कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.(Rohit Pawar met BJP ministers in Delhi) या दौर्यात त्यांनी भाजपा नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावला आहे. रोहित पवारांनी भाजपा मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्याने राजकीय वर्तुळात आता वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. दिल्ली दौऱ्यात रोहित पवार यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman), सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार (Minister for Social Justice and Empowerment Dr. Virendra Kumar), अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी (Minority Affairs Minister Mukhtar Abbas Naqvi) सह आदींची भेट घेतली आहे.

आमदार रोहित पवार यांचा दिल्लीचा दौरा हा राजकीय दौरा नसल्याचे आता समोर आले आहे. रोहित पवार यांनी कर्जत – जामखेड मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्याचे आता समोर आले आहे.(Rohit Pawar met BJP ministers in Delhi)
आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मंगळवारी (ता. १४) भेट घेऊन कर्जत आणि जामखेड तालुक्यांमधील आर्थिक विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी चर्चा केली व विविध मागण्यांचे निवेदन दिले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेप्रमाणे शहरी असंघटित कामगारांसाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम सुरू करावा अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी निर्मला सीतारामन यांच्याकडे केली तसेच मतदारसंघात बँकांचे जाळे कमी आहे. ते वाढवण्याचीही मागणी केली. (Rohit Pawar met BJP ministers in Delhi)
